Sunday, May 10, 2026
Homeक्राईमजामनेरात आयपीएलवर सट्टा लावणार्‍या टोळीचा पर्दाफाश

जामनेरात आयपीएलवर सट्टा लावणार्‍या टोळीचा पर्दाफाश

जामनेरात आयपीएलवर सट्टा लावणार्‍या टोळीचा पर्दाफाश

रोख रक्कम, मोबाईल, एटीएम कार्डसह चौघे जेरबंद

जामनेर : आयपीएल क्रिकेट सामन्यांवर ऑनलाईन सट्टा लावून जुगार खेळणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) धडक कारवाई करत लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. जामनेर पोलीस स्टेशन हद्दीतील हिवरखेडा रोड परिसरात सुरू असलेल्या या ऑनलाईन सट्टा अड्ड्यावर छापा टाकत पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले.

जामनेर परिसरात काही इसम घरामध्ये बसून आयपीएल क्रिकेट मॅचवर ऑनलाईन सट्टा लावत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी खात्री करून नियोजनबद्ध पद्धतीने छापा टाकला. या कारवाईत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम व इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आले.

छाप्यामध्ये पोलिसांनी ९ लाख २ हजार ३०० रुपये रोख रक्कम, १ लाख ३० हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन, २५ हजार रुपये किमतीचा टीव्ही व साउंड बार, तसेच ४१ एटीएम कार्ड असा मुद्देमाल हस्तगत केला. इतर साहित्यांसह एकूण १० लाख ५३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणात देवानंद सुभाष सोनवणे, रितेश अशोक नेरकर, परीक्षित रविंद्र पाटील आणि प्रवीण जगन्नाथ टहाकडे, सर्व रा. जामनेर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या कारवाईवरून जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २३६/२०२६ नुसार महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम ४ आणि ५ अंतर्गत चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या