Wednesday, February 4, 2026
Homeखानदेशगर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचा विशेष पदग्रहण सोहळा उत्साहात

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचा विशेष पदग्रहण सोहळा उत्साहात

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचा विशेष पदग्रहण सोहळा उत्साहात

प्रदेश उपाध्यक्षपदी विनायकराव दिवटे; उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी मुराद पटेल, सचिवपदी मंगल पाटील; जिल्हाध्यक्ष चेतन वाणी तर शहराध्यक्ष जितेंद्र कोतवाल

जळगाव (प्रतिनिधी) : गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे रविवारी (दि. १ फेब्रुवारी) पद्मालय विश्रामगृह येथे विशेष पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. या वेळी संघटनेच्या विविध पदांवर नव्याने निवड व नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी विनायकराव दिवटे, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी वसंत दिलीप पाटील, कार्याध्यक्षपदी मुराद पटेल तर सचिवपदी मंगल पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. जळगाव जिल्हाध्यक्षपदी चेतन रवींद्र वाणी तर शहराध्यक्षपदी जितेंद्र संतोष कोतवाल यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली.

या कार्यक्रमास केंद्रीय अध्यक्ष नरेंद्र कदम, केंद्रीय कार्याध्यक्ष सागर ओतारी, उपाध्यक्ष रवींद्र पवार, केंद्रीय सचिव भगवान सोनार, खजिनदार ललित खरे, सदस्य गणेश पाटील, साक्री (ता. धुळे) येथील पदाधिकारी जोशीला पगारिया यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत यादव, डॉ. दिलीप तिवारी, राजेश यावलकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्री गणेशाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रस्तावनेतून अध्यक्ष नरेंद्र कदम यांनी संघटनेची ध्येयधोरणे स्पष्ट करत कार्यक्रमामागील उद्देश मांडला.

यानंतर मान्यवरांनी मनोगतातून संघटनेच्या कार्याचे कौतुक केले. पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात संघटनेच्या माध्यमातून एकजूट दाखवून सातत्याने आवाज उठवूया, असे आवाहन यावेळी करण्यात आले. पत्रकारांच्या समस्या, त्यांच्या पाल्यांचे शिक्षण, रोजगार व आरोग्य याबाबत संघटनेच्या माध्यमातून प्रभावी कार्य करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.

यावेळी विविध निवड प्रक्रिया जाहीर करून मान्यवरांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यात उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी वसंतराव पाटील, कार्याध्यक्षपदी चाळीसगावचे मुराद पटेल, उपाध्यक्षपदी दीपक कुलकर्णी, सचिवपदी जळगाव तालुक्यातील मंगल पाटील, संघटकपदी राकेश विजय वाणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच जळगाव जिल्हाध्यक्षपदी चेतन रवींद्र वाणी, जिल्हा कार्याध्यक्षपदी हेमंत सुरेश पाटील, जिल्हा सचिवपदी वसीम शब्बीर खान यांची एकमताने निवड करण्यात आली.

जिल्हा उपाध्यक्षपदी धानोऱ्याचे प्रशांत सोनवणे, सुमित सुरेश देशमुख, लोहा-याचे दीपक वामन पवार, जिल्हा सहसचिव म्हणून राजेंद्र यु. पाटील, खजिनदार म्हणून पंकज शेटे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख म्हणून विश्वजीत चौधरी यांची नियुक्ती झाली. जळगाव शहर अध्यक्षपदी जितेंद्र संतोष कोतवाल तर शहर कार्याध्यक्षपदी जकी अहमद,  सचिव योगेश रमेश चौधरी यांची एकमताने नियुक्ती झाली. शहर उपाध्यक्ष म्हणून पवन खंबायत, नितीन पुंडलिक सोनवणे, निखिल अशोक मोरे, सहसचिवपदी नरेश प्रधान बागडे यांची नियुक्ती झाली.

तर शहर खजिनदार म्हणून गोकुळ सोनार, शहर संघटक म्हणून भूषण हंसकर,  सहसंघटक म्हणून राजेंद्र रामराव पाटील तसेच सदस्य म्हणून इकबाल पटेल यांची निवड करण्यात आली आहे. या सर्व निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन त्यांच्यावर आगामी काळात मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे.

सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी एकमताने, आम्ही संघटनेचे कार्य जोमाने पुढे नेऊ. पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणाच्या दृष्टिकोनातून विविध कार्यक्रमांची आखणी करू असे आश्वासन यावेळी दिले. सूत्रसंचालन भगवान सोनार यांनी केले. तर आभार विश्वजीत चौधरी यांनी मांडले. कार्यक्रमासाठी गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या विविध पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

 

ताज्या बातम्या