Saturday, May 16, 2026
Homeक्राईमदोनगाव शिवारात गावठी पिस्तुलसह एक जेरबंद

दोनगाव शिवारात गावठी पिस्तुलसह एक जेरबंद

दोनगाव शिवारात गावठी पिस्तुलसह एक जेरबंद

गिरणा नदीपात्रातील संयुक्त कारवाई; पाळधी व धरणगाव पोलिसांची धडक मोहीम

पाळधी, ता. धरणगाव : धरणगाव व पाळधी पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत दोनगाव शिवारातील गिरणा नदीपात्र परिसरातून एका संशयिताला गावठी पिस्तुलसह अटक करण्यात आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या निर्देशानुसार सध्या जिल्ह्यात अवैध धंदे, शस्त्र बाळगणारे संशयित तसेच गुन्हेगारांच्या शोधासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने पाळधी पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश कोते हे आपल्या पथकासह दोनगाव शिवारातील गिरणा नदीपात्र परिसरात अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी गस्त घालत होते.

या दरम्यान जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील आनंदा बळीराम सपकाळे हा संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आला. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. संशय बळावल्याने पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून सुमारे २५ हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तुल व एक मॅगझिन जप्त करण्यात आले.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर तसेच चोपडा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पवार, पाळधीचे स.पो.नि. गणेश कोते, दत्तात्रय बडगुजर, ज्ञानेश्वर बाविस्कर, रवींद्र चौधरी व विशाल पाटील यांनी सहभाग घेतला.
या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास दत्तात्रय बडगुजर करीत आहेत.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या