Thursday, May 7, 2026
Homeजळगाव जिल्हाभाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस!

भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस!

मुंबई ( वृत्तसंस्था)महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तर्क-वितर्कांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) विधिमंडळ गटाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची एकमताने नेतेपदी निवड करण्यात आली आहे.

ही महत्त्वाची बैठक केंद्रीय पर्यवेक्षक आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन तसेच गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या उपस्थितीत पार पडली. बैठकीत सर्व आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवला आणि त्यांची मुख्यमंत्रीपदासाठी निवड करण्यात आली.

विधायक दलाचा नेता निवड झाल्यानंतर आज दुपारी साडेतीन वाजता महायुतीचे नेते राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत. महायुतीकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापनेसाठी पाठिंबा दर्शवला जाणार आहे.

राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा केल्यानंतर ५ डिसेंबर रोजी मुंबईतील ऐतिहासिक आजाद मैदानावर नवा मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा भव्य शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या