Thursday, May 7, 2026
Homeक्राईमजिल्ह्यातील रेकॉर्डवरील दोन गुन्हेगार कोल्हापूर नागपूर ,कारागृहात स्थानबद्ध

जिल्ह्यातील रेकॉर्डवरील दोन गुन्हेगार कोल्हापूर नागपूर ,कारागृहात स्थानबद्ध

जळगाव:-  पोलीस ठाण्यांमध्ये विविध प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असणाऱ्या जळगाव येथील गुरुजीत सिंग बावरी आणि चाळीसगाव येथील भोला अजबे या दोन रेकॉर्ड वरील गुन्हेगारांवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली असून या दोन्ही गुन्हेगारांची कोल्हापूर आणि नागपूर कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये राहणारा गुरुजीत सिंग सुजान सिंग बावरी व 24 राहणार सद्गुरु नगर सिरसोली नाका तांबापुरा याच्या विरुद्ध गंभीर स्वरूपाचे 11 गुन्हे दाखल आहेत. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी बावरी याच्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता.

त्यानुसार 29 रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी त्याला कोल्हापूर कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश पारित केले. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, पोलीस उपनिरीक्षक अशोक , योगेश बारी, किशोर पाटील, छगन तायडे,, किरण पाटील यांनी 29 रोजी ताब्यात घेऊन त्याची नागपूर कारागृहात रवानगी करण्यात आली.

तसेच चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत राहणारा निखिल उर्फ भोला सुनील अजबे वय 23 राहणार लक्ष्मी नगर चाळीसगाव याच्याविरुद्ध नऊ गुन्हे दाखल आहेत. हा गुन्हेगार धोकादायक व्यक्ती असल्याच्या कारणावरून त्याच्या स्थानबद्धतेचा प्रस्ताव चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कवाडी यांनी तयार करून 18 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी 29 रोजी एमपीडीए कायद्यानुसार अजबे याला नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.

पोलीस निरीक्षक किरण कुमार कवाडी, सुभाष पाटील, योगेश मांडोळे, राहुल सोनवणे, समाधान पाटील, भूपेश वंजारी, नरेंद्र चौधरी, राकेश महाजण, पवन पाटील नितेश पाटील, आदींनी ताब्यात घेऊन त्याची नागपूर कारागृहात रवानगी केली. वरील दोघा गुन्हेगारांचे प्रस्ताव पोलीस अधीक्षक महेश वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय अधिकारी संदीप गावित, उपविभागीय अधिकारी राजेश सिंह चंदेल, यांच्या मार्गदर्शनाखाली  स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, सुनील पंडित दामोदरे, जयंत चौधरी, रफिक शेख कालू, संदीप चव्हाण, ईश्वर पाटील यांनी काम पाहिले.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या