Thursday, May 7, 2026
Homeक्राईमसोनसाखळी चोरीप्रकरणी दोन जणांना अटक 

सोनसाखळी चोरीप्रकरणी दोन जणांना अटक 

सोनसाखळी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक 

जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील एमआयडीसी परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांवर लगाम घालत पोलिसांनी अयोध्या नगर भागात महिलेकडून जबरीने सोनसाखळी हिसकावून पळ काढणाऱ्या दुचाकीस्वारांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात यश मिळवले आहे. अवघ्या काही दिवसांतच राबवलेल्या सखोल तपासातून दोन संशयितांना अटक करत चोरीस गेलेली सोन्याची लगडही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

दि. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी अयोध्या नगरात घडलेल्या या घटनेत महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी पलायन केले होते. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.

गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांना आरोपींबाबत महत्त्वाच्या सुगावा मिळाले. १८ नोव्हेंबर रोजी माऊली नगर येथे सापळा रचून पोलिसांनी तेजस अनिल ईखनकर (रा. ज्ञानदेव नगर) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देत साथीदार प्रसाद उर्फ परेश संजय महाजन (रा. ज्ञानदेव नगर) याचे नाव उघड केले. विशेष म्हणजे, प्रसाद हा शनिपेठ हद्दीत झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातून आधीपासूनच फरार होता.

त्यानुसार, पोलिसांनी १९ नोव्हेंबर रोजी त्यालाही माऊली नगर परिसरातून ताब्यात घेतले. दोघांकडून ८ ग्रॅम वजनाची, सुमारे ८० हजार रुपये किमतीची सोनसाखळी हस्तगत करण्यात आली आहे. ही कारवाईपोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड , पोलिस उप निरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, सहायक फौजदार विजयसिंग पाटील, हे कॉ प्रदीप चौधरी, गिरीश पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण चौधरी, पो कॉ नितीन ठाकुर, किरण पाटील, शशिकांत मराठे, चेतन पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या