Tuesday, August 25, 2026
Homeखानदेशबुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा

बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा

बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा

२६ रोजी भव्य कार्यक्रम; सहकार क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

जळगाव | प्रतिनिधी : सहकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या बुलडाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. प्रतापनगरजवळ ढाके कॉलनी-गणेश कॉलनी रोडवरील राजर्षी शाहू कॉम्प्लेक्ससमोरील ‘बुलडाणा अर्बन भवन’ येथे हा सोहळा होणार आहे.

 

मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

या सोहळ्यास बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक (भाईजी), बुलडाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेडचे अध्यक्ष डॉ. सुकेशजी झंवर, बुलडाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटीच्या अध्यक्षा सौ. कोमलताई झंवर तसेच पाचोरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुभाषजी तोतला यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.उद्घाटनानंतर कानळदा रोडवरील के.सी. पार्कसमोरील समर्थ लॉन्स येथे मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून उपस्थितांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यात ३२ शाखांचे जाळे

बुलडाणा अर्बनने जळगाव जिल्ह्यात आपल्या सेवांचा मोठ्या प्रमाणात विस्तार केला आहे. संस्थेच्या माहितीनुसार जिल्ह्यात एकूण ३२ शाखा कार्यरत आहेत. जळगाव, भुसावळ, वरणगाव, रावेर, फत्तेपूर, जामनेर, पाचोरा, नगरदेवळा, चोपडा, गोलाणी मार्केट, चाळीसगाव आणि धरणगाव यांसह विविध ठिकाणी संस्थेची शाखा कार्यालये कार्यरत आहेत.

जिल्ह्यात संस्थेची ७ स्वमालकीची गोदामे असून त्यांची एकत्रित क्षमता सुमारे ४ लाख ५० हजार पोत्यांची आहे. तसेच जळगाव व भुसावळ येथे दोन स्वमालकीची शीतगृहे असून त्यांची क्षमता सुमारे १ लाख ५० हजार पोत्यांची आहे.

५११ कोटींच्या ठेवी; ४५८ कोटींचे कर्ज

जळगाव जिल्ह्यात संस्थेच्या एकूण ५११ कोटी रुपयांच्या ठेवी असून सुमारे ४५८ कोटी रुपयांचे कर्ज वितरण झाले आहे. यामध्ये ३२१ कोटी रुपयांचे सोनेतारण कर्ज आणि ३५ कोटी रुपयांचे वेअरहाऊस तारण कर्ज असल्याची माहिती संस्थेने दिली आहे.

वेअरहाऊसच्या माध्यमातून शेतकरी आणि व्यापाऱ्यांना धान्य व कृषीमाल सुरक्षितपणे साठविण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

४८२ शाखा आणि ४६२ गोदामांचा विस्तार

संस्थेच्या एकूण कार्यक्षेत्रात ४८२ शाखा आणि ४६२ गोदामे असल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले. संस्थेच्या एकूण ठेवी १६ हजार १७७ कोटी रुपये, तर एकूण कर्ज ११ हजार ७९५ कोटी रुपये आहे. संस्थेची सभासद संख्या १६ लाख ५ हजार ८४१ असून सोनेतारण कर्ज ५ हजार ६७२ कोटी रुपये आणि वेअरहाऊस तारण कर्ज ४४० कोटी रुपये असल्याची माहिती देण्यात आली.

आर्थिक व्यवहारांसोबत सामाजिक बांधिलकी

आर्थिक व्यवहारांसोबतच सामाजिक बांधिलकी जपण्यावरही बुलडाणा अर्बनने भर दिला आहे. तिरुपती बालाजी, माहूरगड, शिर्डी, तुळजापूर, अयोध्या आणि पंढरपूर येथे भक्तनिवास सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.बुलडाणा येथील सहकार विद्या मंदिरात सीबीएसई पॅटर्न निवासी शाळेसह विविध ठिकाणी संस्थेच्या २६ इंग्रजी माध्यमाच्या शाळा असून सुमारे ३० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

याशिवाय सभासदांच्या पाल्यांसाठी पुणे व बुलडाणा येथे वसतिगृह सुविधा, बुलडाणा व मोर्शी येथे गो-रक्षण धाम, बुलडाणा येथे वेद विद्यालय, महामार्गांवर रुग्णवाहिका व स्वर्गरथ सेवा तसेच मलकापूर ते चिखली महामार्गाचे बीओटी तत्त्वावर बांधकाम अशा विविध सामाजिक उपक्रमांचा संस्थेच्या कार्यात समावेश आहे.

शेतकरी-व्यापाऱ्यांसाठी विविध कर्ज सुविधा

संस्थेच्या शाखांमधून सोनेतारण कर्ज, वेअरहाऊस पावती तारण कर्ज, एलआयसी तारण कर्ज तसेच लॉकर सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. वेअरहाऊस सुविधेमुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांना विविध प्रकारचे धान्य व कृषीमाल सुरक्षितपणे साठविता येत असून त्यावर आधारित कर्ज सुविधांचाही लाभ घेता येतो.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या