Thursday, May 7, 2026
Homeक्राईमपंधरा हजाराची लाच स्वीकारताना दोन पोलीस जाळ्यात

पंधरा हजाराची लाच स्वीकारताना दोन पोलीस जाळ्यात

पारोळा धुळे-अपघात प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये अटक न करण्यासाठी पंधरा हजारांची लाच मागणाऱ्या पारोळा पोलीस स्टेशनच्या दोन हवालदारांना धुळे लाचलुचपत विभागाच्या पथकाने आज 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी अटक केली असून दोघांविरुद्ध पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे

हिरालाल देविदास पाटील (43, रा.प्लॉट. नं.66, हरिओम नगर, गळवाडे रोड, अमळनेर) असे अटकेतील हवालदाराचे तर प्रवीण विश्वास पाटील (45, रा.पोलीस लाईन, बसस्थानकाजवळ, पारोळा) असे पसार हवालदाराचे नाव आहे.

25 वर्षीय तक्रारदार हे गुरुवार, 7 नोव्हेंबर रोजी पारोळा ते धरणगाव जात असताना त्यांच्या मोटारसायकलची धडक समोरील मोटारसायकलीला बसल्यानंतर एकाचा मृत्यू ओढवला होता. तक्रारदाराविरोधात पारोळा पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी हिरालाल पाटील व प्रवीण पाटील यांनी 30 हजारांची लाच मागितली. तक्रारदाराने धुळे एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर लाच पडताळणी केल्यानंतर सापळा रचण्यात आला. हिरालाल पाटील यांनी प्रवीण पाटील यांना फोन करीत त्यांच्याकडे लाच रक्कम देण्यास सांगितल्यानंतर लाच रक्कम देताच त्यांना अटक करण्यात आली तर हवालदार हिरालाल पाटील पसार झाले. बुधवारी सायंकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आल्यानंतर दोघांविरोधात पारोळा पोलिसात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, हवालदार राजन कदम, मुकेश अहिरे, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर, शिपाई रामदास बारेला, प्रवीण पाटील आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या