Thursday, May 7, 2026
Homeजळगाव जिल्हाधनुष्यबाणाच्या जयघोषात आसोदा दणाणले !

धनुष्यबाणाच्या जयघोषात आसोदा दणाणले !

धनुष्यबाणाच्या जयघोषात आसोदा दणाणले !

टाळ मृदंगाचा गजर आणि वासुदेवांनी केली धमाल

गुलाब भाऊंच्या विकासाच्या मार्गावर आसोदेकरांचा भक्कम पाठिंबा

आसोदा/जळगाव :-आसोदा आणि परिसरात शिवसेनेचे लोकप्रिय नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रचारसभेने विकासाचा जयघोष केला. “रस्ते फुल, गावांतर्गत सर्वांगीण विकास, शेत रस्ते, सिंचन बंधारे, ज्येष्ठ नागरिक सभागृह आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी स्मारक” अशा विकासकामांची यशस्वी पूर्तता झाल्याने आसोदा व परिसरात उत्साहाचे वातावरण दिसून आले. आसोदेकरांनी कधीही जाती-पातीच्या राजकारणाला थारा न देता विकासाच्या बाजूने भक्कमपणे उभे राहण्याचा आदर्श कायम ठेवला असल्याचे प्रचारादरम्यान नागरिकांशी संवाद साधताना सांगितले.*

*वासुदेवांच्या गीतांनी उधळला प्रचाराचा रंग*
“वासुदेव आला रे, वासुदेव आला! गुलाबभाऊंच्या साथीनं धनुष्यबाण आला !” या वासुदेवांच्या खास गीतांनी संपूर्ण असोदा परिसर दुमदुमून गेला. हातात चिपळ्या, गळ्यात गजरा, आणि ओठावर गुलाबभाऊंच्या कार्याचा जयघोष करणाऱ्या गीतांनी प्रचारात रंगत आणली. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि वासुदेवांच्या उत्साही सादरीकरणाने नागरिक मंत्रमुग्ध झाले.

घरोघरी आरत्या, बहिणींचे औक्षण आणि आशीर्वाद

प्रचाराच्या दरम्यान महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. सुमारे 500 हून अधिक महिलांनी गुलाबभाऊंचे औक्षण करून त्यांच्या विजयासाठी आशीर्वाद दिले. लाडक्या बहिणींचा एकच भाऊ – गुलाब भाऊ या घोषणा लक्षवेधी ठरल्या “गुलाबभाऊ म्हणजे आसोदेकरांचा लाडका भाऊ!” या भावना महिलांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या.

धनुष्यबाणाच्या रॅलीत मान्यवरांचा सहभाग
शिवसेनेच्या प्रचार रॅलीत माजी महापौर ललित कोल्हे, जनाआप्पा कोळी, बापू महाजन, विनायक ढाके, गिरीश भोळे, तुषार महाजन, महेश भोळे, जीवन सोनवणे, सूर्यकांत चौधरी, अजय महाजन, सुभाष माळी, किशोर चौधरी, दिनकर भील, मधुकर कुंभार, चंदन बिऱ्हाडे, बाळकृष्ण पाटील, सचिन चौधरी, संजय बिराडे, संजय कोळी, भजनी मंडळाचे गोपाळ भोळे, श्रीराम संस्थेचे सुदाम चौधरी, असलमभाई, उमेश बाविस्कर, अनिल कोळी, गजू सावदेकर, पिंटू नारखेडे यांसह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.

*आसोदेकरांचा ठाम निर्धार*
धनुष्यबाणाच्या प्रतिकाने विकासाची परंपरा सुरू ठेवण्याचा निर्धार आसोदे करांनी व्यक्त केला. शिवसेनेचा प्रचार जसा जल्लोषात पार पडला, तसाच या भागातील प्रत्येक व्यक्तीने गुलाबभाऊंच्या विजयासाठी अंग झोकून काम करण्याचा संकल्प केला आहे.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या