Friday, June 13, 2025
Homeजळगाव जिल्हाजळगावच्या विकासाचा रथ अविरत...

जळगावच्या विकासाचा रथ अविरत…

जळगाव:- ज्येष्ठ उद्योजक व जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.चे चेअरमन अशोक जैन व जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी-महायुतीचे अधिकृत उमेदवार सुरेश दामु भोळे ऊर्फ राजूमामा यांची जळगावच्या विकासासंदर्भात व ‘व्हिजन डॉक्युमेंट 2024-2029’ यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली.

जळगाव शहराचा कायापालट करण्यासाठी राजूमामांनी येत्या पाच वर्षात करावयाची कामे यासंदर्भात श्री.अशोकभाऊ जैन यांनी त्यांना मार्गदर्शन केले. जैन हिल्स येथे झालेल्या या भेटीत सामाजिक, औद्योगिक, व्यावसायिक, दळण-वळण, पर्यावरण, शैक्षणिक, क्रीडा, ऊर्जा आदि विषयांवर दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली. या दुग्धशर्करा भेटीमुळे जळगावला वैभवप्राप्त करण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.

ताज्या बातम्या