Sunday, June 15, 2025
Homeजळगाव जिल्हाअशोक जैन यांच्यासह जैन परिवाराने बजावला मतदानाचा हक्क

अशोक जैन यांच्यासह जैन परिवाराने बजावला मतदानाचा हक्क

जळगाव दि.२० (प्रतिनिधी) – जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अतुल जैन, अभेद्य जैन, अभंग जैन या सह जैन परिवारातील सर्व सदस्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मतदानाचा हक्क बजावला. ‘स्वतः केले मग सांगितले…’ या उक्तीप्रमाणे मतदानाचे महत्व पटवून देणे, नागरिकांना मतदान करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी जैन परिवाराने सकाळी ७ वाजून ०५ मिनिटांनी आपले मतदान केले.

जैन परिवारातील सदस्यांचे मतदान एम.जे. कॉलेज जवळील ओरियन इंग्लिश मीडियम स्कूल या मतदान केंद्रात होते. त्यांनी मतदानाचे महत्त्व आणि लोकशाहीच्या प्रक्रियेत मतदान करून भाग घेतला. जैन परिवारातील अशोक जैन, सौ. ज्योती जैन, आरोही जैन, अजित जैन, सौ. शोभना जैन, अतुल जैन व डॉ. भावना जैन, अभेद्य जैन, अभंग जैन या सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला.

– _फोटो कॅप्शन – विधानसभा निवडणुक-२०२४ मदतान केल्या नंतर जैन परिवारातील सदस्य डावीकडून अभेद्य जैन, अजित जैन, सौ. शोभना जैन, सौ. ज्योती जैन, अशोक जैन, अतुल जैन, डॉ. भावना जैन, आरोही जैन आणि अभंग जैन._ ————————————-

ताज्या बातम्या