Wednesday, July 30, 2025
HomeBlogमहाराष्ट्राच्या जनसेवेचा नवा अध्याय: गिरीश महाजन यांचा पंढरपूर येथील निःस्वार्थ सेवेचा आदर्श

महाराष्ट्राच्या जनसेवेचा नवा अध्याय: गिरीश महाजन यांचा पंढरपूर येथील निःस्वार्थ सेवेचा आदर्श

महाराष्ट्राच्या जनसेवेचा नवा अध्याय: गिरीश महाजन यांचा पंढरपूर येथील निःस्वार्थ सेवेचा आदर्श

पंढरपूर, ६ जुलै २०२५: पंढरपूरच्या पावन भूमीत आज जनसेवेचा एक नवा अध्याय लिहिला गेला. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री मा. गिरीश महाजन यांनी ५ जुलैच्या मध्यरात्रीपासून ६ जुलैच्या सायंकाळी ५ वाजेपर्यंत सलग १७ तास अखंड सेवा देत वारकऱ्यांप्रती आपली निष्ठा आणि समर्पण दाखवून दिले.विठुरायाच्या महापूजेनंतर पंढरपूरच्या महाद्वार परिसरात जमलेली प्रचंड गर्दी व्यवस्थापित करणे हे मोठे आव्हान होते. या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी गिरीश महाजन सकाळी ५:३० वाजता देखरेख टॉवरवर चढले आणि सायंकाळी ५ वाजेपर्यंत तिथेच राहून गर्दी नियंत्रणाचे संचालन केले.या काळात त्यांनी वारकऱ्यांना मार्गदर्शन केले,

वॉकी-टॉकीद्वारे पोलिस आणि आपत्कालीन यंत्रणांशी समन्वय साधला, आणि गरज पडल्यास स्वतः मैदानात उतरून मदत केली. ऊन-पावसाची तमा न बाळगता, विश्रांती किंवा आराम न करता त्यांनी केवळ विठोबाच्या भक्तांच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेतले.

या निःस्वार्थ सेवेमुळे वारकरी, पोलीस, स्वयंसेवक आणि अधिकाऱ्यांनी गिरीश महाजन यांच्या कार्याला मनापासून दाद दिली. अनेकांनी टॉवरकडे पाहून हात जोडले, वंदन केले आणि भावूक झाले.प्रेरणादायी नेतृत्व: गिरीश महाजन हे केवळ मंत्री नसून, एक खरे सेवक आणि प्रेरणास्थान आहेत. त्यांनी पंढरपूरच्या आषाढी वारीत दाखवलेली ही निःस्वार्थ सेवा नव्या पिढीला दिशा देणारी ठरेल.

ताज्या बातम्या