Sunday, September 20, 2026
Homeक्रीडा६८ व्या शालेय राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेच्या पुर्व प्रशिक्षण शिबीरासाठी १९ वर्षे आतील...

६८ व्या शालेय राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेच्या पुर्व प्रशिक्षण शिबीरासाठी १९ वर्षे आतील मुलांमध्ये दानिश तडवी , दर्शन कानवडे रवाना

जळगाव:- २० ते २४ डिसेंबर २०२४ देवास, मध्य प्रदेश येथे ६८ व्या शालेय राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघात जळगांव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा जैन स्पोर्टस् अकॅडमी चे मुलांच्या १९ वर्षे आतील ४५ किलो आतील वजन गटात दानिश रहेमान तडवी सरदार जी जी हायस्कूल रावेर तथा ६८ किलो आतील वजन गटात दर्शन कानवडे यांची निवड झाली आहे. सदर महाराष्ट्र संघाचा स्पर्धा पुर्व प्रशिक्षण दिनांक १४ ते १८ डिसेंबर रोजी अमरावती जिल्हा क्रीडा संकुल येथे घेण्यात येणार आहे. सदर दोन्ही खेळाडूंना एन आय एस प्रशिक्षक श्री जयेश बाविस्कर यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल संघटनेचे अध्यक्ष श्री अतुल जैन, उपाध्यक्ष श्री ललीत पाटील, महासचिव श्री अजित घारगे, कोषाध्यक्ष श्री सुरेश खैरनार, सहसचिव श्री रविंद्र धर्माधिकारी, सदस्य श्री सौरभ चौबे, महेश घारगे, श्री नरेंद्र महाजन, श्री कृष्णकुमार तायडे तसेच जैन स्पोर्टस् अकॅडमी चे अरविंद देशपांडे यांनी शुभेच्छा दिल्या

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या