Thursday, May 7, 2026
Homeजळगाव जिल्हादेवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्यासाठी आमदार भोळे यांच्या हस्ते हनुमान मंदिरात महाआरती

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्यासाठी आमदार भोळे यांच्या हस्ते हनुमान मंदिरात महाआरती

जळगाव (प्रतिनिधी):- देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुन्हा होण्यासाठी भाजप जिल्हा महानगरतर्फे श्री हनुमान मंदिर येथे आज सायंकाळी महाआरतीचे आयोजन आमदार राजू मामा भोळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. यावेळी हनुमानाला साकडे घालण्यात आले.

राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा  देवेंद्र  फडणवीस व्हावेत यासाठी कोल्हा आणि मार्केट येथील हनुमान मंदिरात आज 28 रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास नवनियुक्त आमदार राजू मामा उर्फ सुरेश भोळे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा महानगराध्यक्ष सौ उज्वलाताई बेंडाळे यांच्यासह भाजप आणि महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या