Thursday, May 7, 2026
Homeक्राईमभुसावळच्या 65 वर्षीय वृद्धाला 19 लाखांचा ऑनलाइन गंडा

भुसावळच्या 65 वर्षीय वृद्धाला 19 लाखांचा ऑनलाइन गंडा

भुसावळ :  एका ६५ वर्षीय वृद्धाला बँकेचे व्यवहार घरपोच करून देऊन चांगले रिटर्न मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल १९ लाख ४०५ रुपयांची फसवणूक केल्याची  घटना उघडकीला आली असून. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात दोन जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील तापी नगरमधील प्रदीपसिंह प्रतापसिंह परदेशी (वय६५) हे वृद्ध आपल्या परिवारासह वास्तव्याला असून ते सेवानिवृत्त आहेत.

दरम्यान, १० मार्च २०२३ ते ६ डिसेंबर २०२३च्या दरम्यान जळगाव येथे राहणारे संदीप यांनी प्रदीपसिंह परदेशी यांना बँकेचे व्यवहार घरपोच करून देऊन चांगले रिटर्न मिळवून देऊ, असे सांगितले. त्यानंतर त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून कॅश, ऑनलाईन व चेकद्वारे तब्बल १९ लाख ४०५ रुपये स्वीकारून त्याच्या मोबदल्यात बनावट व हुबेहूब दिसणारे कागदपत्र तयार करून त्यांच्या घरी आणून अपहार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्रदीपसिंह परदेशी यांनी २५ नोव्हेंबर गावीशी बर पोलीस ठाण्यात धाव घेऊन या संदर्भात तक्रार दिली.

त्यानुसार संशयित आरोपी संदीप चौधरी व सोनाली चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पीएसआय विजय गायकवाड करत आहेत.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या