Sunday, June 21, 2026
Homeक्राईमजळगावात 14 वर्षीय विद्यार्थ्याची गळफास घेत आत्महत्या

जळगावात 14 वर्षीय विद्यार्थ्याची गळफास घेत आत्महत्या

जळगाव : शाळेतून घरी आल्यानंतर विद्यार्थ्याने घरात कोणीही नसल्याचे पाहून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना. सोमवार, २५ रोजी दुपारी घडली असून ओम पंडित चव्हाण (वय १४, रा. गणेश कॉलनी) असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे. तो नववी इयत्तेचा विद्यार्थी होता.

पंडित चव्हाण हे ब्रोकर म्हणून कामकाज पाहतात. ते मुळ लिहेतांडा (ता. जामनेर) येथील आहेत.  गणेश कॉलनीत त्यांनी स्वतःचे घर घेतले आहे. या ठिकाणी पत्नी मुलगा, व मुलगी असे कुटुंब वास्तव्याला आहेत. त्यांचा ओम हा  एकुलता एक होता. तो शहरातील आर. आर. विद्यालयात इयत्ता नववीच्या वर्गात शिकत होता.

नेहमी प्रमाणे तो शाळेत गेला. त्यानंतर त्यांची बहिणही शाळेत रवाना झाली. पंडित चव्हाण यांच्यावर शस्त्रक्रिया करायची होती. त्यानुसार डॉक्टरांचा सल्ला व पत्नीच्या तपासणीसाठी चव्हाण दाम्पत्य दुपारी दवाखान्यात गेले होते. त्यामुळे घरी कोणी नसताना. शाळा सुटल्यानंतर साई  याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

हा प्रकार शेजाऱ्यांच्या लक्षात येताच त्याला रिक्षात नेऊन तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले. बेशुध्दावस्थेतील साई याला तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषीत केले. त्यानंतर या घटनेची खबर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दिली. याबाबत पोलिसात अकस्मात मृत्यूचे नोंद करण्यात आली आहे

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या