Thursday, May 7, 2026
Homeआणखीकुसुंबा येथे तरुणाने घेतला गळफास

कुसुंबा येथे तरुणाने घेतला गळफास

जळगाव : एका 35 वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची  घटना शनिवारी दि. १६ नोव्हेंबर रोजी पहाटे तालुक्यातील कुसुंबा येथेउघडकीस आली.. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. लहू बाळू पाटील (वय ३५, रा. कुसुंबा, ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.

औद्योगिक वसाहत परिसरात एका कंपनीत लहू पाटील हा कामाला होता. शुक्रवारी रात्री लहू पाटील व त्यांचे कुटुंबीय पुढील खोलीत झोपले होते. मध्यरात्री २ ते अडीच वाजेदरम्यान ते पाणी पिण्यासाठी उठल्याचे पत्नीने पाहिले होते. मात्र, त्यानंतर मध्यरात्री लहू पाटील यांनी मागील खोलीत जाऊन गळफास घेतला.

सकाळी ६ वाजता पत्नी झोपेतून उठल्यानंतर मागील खोलीचा दरवाजा लोटला असता पती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्याने पत्नीने हंबरडा फोडला. कुटुंबीयांनी शेजारील मंडळी व नातेवाईकांच्या मदतीने त्यास जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले पा असता डॉक्टरांनी तपासून त्यास मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, त्याच्या पश्चात पत्नी, ७ वर्षांचा मुलगा, ४ वर्षांची मुलगी असा परिवार आहे.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या