Tuesday, November 3, 2026
Homeक्राईमविहीर स्वच्छ करून पाणी वापरासह स्वच्छतेच्या समस्यांचे त्वरित निवारणाचे आदेश

विहीर स्वच्छ करून पाणी वापरासह स्वच्छतेच्या समस्यांचे त्वरित निवारणाचे आदेश

विहीर स्वच्छ करून पाणी वापरासह स्वच्छतेच्या समस्यांचे त्वरित निवारणाचे आदेश

महापौर दीपमाला काळे यांचा वॉर्ड क्रमांक १५ मध्ये दौरा

जळगाव: जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांनी ‘महापौर स्वच्छता संकल्प अभियान’ अंतर्गत मंगळवारी (दि. ३ नोव्हेंबर) वॉर्ड क्रमांक १५ ला भेट देऊन विविध विकासकामांची व परिसराची पाहणी केली.

या वेळी स्थानिक नगरसेवक प्रकाश बालाणी, अरविंद देशमुख, रेश्मा काळे, कलाबाई शिरसाळे यांच्यासह आरोग्य विभागाचे प्रमुख समीर बोरोले, बांधकाम विभागाचे अभियंता महेश सुर्वे, तसेच पाणीपुरवठा व विद्युत विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

गटार व स्वच्छता समस्या
दौऱ्याची सुरुवात लाठी शाळेजवळून झाली. या वेळी महापौरांनी परिसराची पाहणी करून तेथील गटारींच्या समस्या तातडीने सोडवण्याचे निर्देश दिले. तसेच सिंधी कॉलनी ते पंचमुखी हनुमान मंदिर दरम्यान निर्माण झालेले कचरा स्पॉट बंद करण्यास सांगितले. रचना कॉलनी जवळील कचरा स्पॉट्सवरून कचरा उचलण्यासाठी बिव्हिजीच्या कर्मचाऱ्यांना त्वरित वाहन देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

अतिक्रमण कारवाईचे आदेश
लाठी शाळेजवळ खुल्या जागेत एका महिलेने केलेल्या अतिक्रमणाबाबत कागदपत्रे तपासून कारवाई करण्याचे, अन्यथा अतिक्रमण काढून टाकण्याचे सक्त आदेश महापौरांनी दिले.
शनिवार बाजार व वाहतूक नियोजन
शनिवार बाजार परिसराची पाहणी करताना, विक्रेत्यांना पक्क्या रेषा (लायनिंग) आखून देऊन त्यानुसारच त्यांना बसवण्याचे निर्देश दिले. रस्त्यावर वाहने येणार नाहीत आणि वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा प्रकारे योग्य नियोजन करण्याबाबत बांधकाम व अतिक्रमण विभागाला सांगण्यात आले. तसेच, अस्वच्छता पसरवणाऱ्या मच्छी विक्रेत्यांना दंड आकारण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
बालवाडी परिसरातील विहिरीचा वापर
रचना कॉलनीतील बालवाडीची पाहणी केल्यानंतर, सदर बालवाडीच्या परिसरातील मोठी विहीर स्वच्छ करून तिचे पाणी जळगावकरांच्या वापरासाठी उपलब्ध करून देता येईल का, याबाबत तातडीने नियोजन करण्याचे निर्देश पाणीपुरवठा विभागाला देण्यात आले

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या