Tuesday, November 3, 2026
Homeजळगाव जिल्हाउघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे निर्देश

उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे निर्देश

उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे निर्देश

वार्ड क्र. १० मध्ये महापौर दीपमाला काळे यांच्याकडून पाहणी

जळगाव : महापौर स्वच्छता संकल्प अभियान अंतर्गत मंगळवारी (दि. २७ ऑक्टोबर) महापौर दीपमाला काळे यांनी वार्ड क्रमांक १० मधील विविध भागांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. या पाहणीदरम्यान खंडेराव नगर, मयूर कॉलनी आणि पिंप्राळा येथील गणपती नगर परिसरातील स्वच्छता, सांडपाणी निचरा, पथदिवे आणि इतर नागरी समस्यांचा आढावा घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कडक निर्देश दिले.

स्वच्छता आणि दंडात्मक कारवाई : खंडेराव नगर परिसरातील खुले भूखंड त्वरित स्वच्छ करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. तसेच, खुल्या जागेवर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर तात्काळ दंडात्मक कारवाई (दंड आकारणे) करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

हायमास्ट लॅम्प दुरुस्ती : परिसरातील हायमास्ट लॅम्पची तातडीने दुरुस्ती करावी आणि गरज पडल्यास नवीन लॅम्प बसवावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या.

गटारीचे साचलेले पाणी : मयूर कॉलनी भागातील एका खुल्या भूखंडावर मोठ्या प्रमाणावर गटारीचे पाणी साचलेले निदर्शनास आल्यावर महापौरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कर्मचाऱ्यांना या पाण्याचा तात्काळ निचरा करण्याचे आदेश देत, गटारींच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यासाठी बांधकाम विभागाला सांगितले.

पथदिवे व वीज कंपनीचा समन्वय : पिंप्राळा येथील गणपती नगर भागात पथदिवे व्यवस्थित नसून एमएसईबीद्वारे खांबाला केबल पेटी लावण्यात आलेली नाही. यावर महापालिका व वीज कंपनीच्या समन्वयातून हे काम त्वरित पूर्ण करून घेण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. प्लास्टिक व कचरा हटाव : परिसरातील ओपन स्पेसमध्ये पडलेला कचरा आणि त्यात मोठ्या प्रमाणावर असलेला प्लास्टिकचा कचरा पाहून महापौरांनी तो तात्काळ काढून टाकण्याचे निर्देश दिले.

या पाहणी दौऱ्यावेळी वार्ड क्रमांक १० चे नगरसेवक सुरेश सोनवणे, माधुरी अतुल बारी, आरोग्य विभागाचे प्रमुख समीर बोरोले, बांधकाम विभागाचे अभियंता मनोज वन्नेरे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या