Thursday, September 17, 2026
Homeखानदेशजळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये १७१ खेळाडूंचा सहभाग

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये १७१ खेळाडूंचा सहभाग

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये १७१ खेळाडूंचा सहभाग

विविध वयोगटांत चुरशीच्या लढती; विजेत्यांचा चषक, पदक व प्रमाणपत्र देऊन गौरव

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने आणि जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड, जळगाव यांच्या प्रायोजकत्वाखाली आयोजित ‘जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान जळगाव जिल्हा क्रीडा संघाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून १७१ खेळाडूंनी सहभाग नोंदविला.

जळगावचे वरिष्ठ बॅडमिंटनपटू स्व. अविनाश दामले यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्मरणार्थ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत ९, ११, १३, १५, १७ व १९ वर्षांखालील मुला-मुलींच्या एकेरी व दुहेरी सामन्यांसह खुल्या गटातील पुरुष व महिला एकेरी, दुहेरी, मिश्र दुहेरी तसेच ३५ वर्षांवरील गटातील विविध सामने घेण्यात आले.

जळगाव, चाळीसगाव, भुसावळ, जामनेर, एरंडोल, पाचोरा, भडगाव, वरणगाव आणि चोपडा या तालुक्यांतील खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेत विविध गटांत चुरशीच्या लढती रंगवल्या.

स्पर्धेतील विजेते व उपविजेत्या खेळाडूंना जैन इरिगेशनतर्फे आकर्षक चषक, सुवर्ण व रजत पदक तसेच प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. बक्षीस वितरणप्रसंगी जळगाव जिल्हा क्रीडा संघाचे अध्यक्ष रजनीकांत कोठारी, राष्ट्रीय खेळाडू ब्रिजेश गौर, जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे क्रीडा समन्वयक अरविंद देशपांडे, अमोल दामले, जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव विनीत जोशी, सदस्य शेखर जाखेटे आणि प्रशिक्षिका दीपिका ठाकूर उपस्थित होते.

निकाल

९ वर्षांखालील मुलींच्या एकेरीत गाथा देशमुख हिने विजेतेपद मिळविले, तर अनन्या माहेश्वरी उपविजेती ठरली. ११ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत अनय पाटील, तर मुलींच्या एकेरीत सुमिती ठाकूर विजेते ठरले. १३ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत दर्शील मुनोत, तर मुलींच्या एकेरीत आरोही माहेश्वरी हिने विजेतेपद पटकावले.

१५ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत अनामय जोशी, तर मुलींच्या एकेरीत पलक महाजन विजेत्या ठरल्या. १७ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत नैतिक शिंदे, तर मुलींच्या एकेरीत ओवी पाटील यांनी बाजी मारली. १९ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत फाल्गुन पाटील, तर मुलींच्या एकेरीत पूनम ठाकूर यांनी विजेतेपद मिळविले.

खुल्या पुरुष एकेरीत तेजम केशव, तर महिला एकेरीत राजश्री पाटील विजेते ठरले. पुरुष दुहेरीत प्रणव पाटील–शुभम पाटील, महिला दुहेरीत गीता पंडित–रीत नाथानी, तर मिश्र दुहेरीत राजश्री पाटील–उमेर देशपांडे यांनी विजेतेपद पटकावले.

३५ वर्षांवरील पुरुष एकेरीत चेतन वराडे, पुरुष दुहेरीत अतुल ठाकूर–चेतन वराडे, तर मिश्र दुहेरीत वृषाली धांडे–किर्ती मुनोत यांनी विजेतेपद मिळविले.

जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडचे अध्यक्ष अशोक जैन आणि जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांनी स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्य पंच दीपिका ठाकूर यांच्यासह सुफयान शेख, पूनम ठाकूर, अर्श शेख, फाल्गुन पाटील, तेजल भालेराव, वैष्णवी बोंडे, राखी ठाकूर आणि तेजम केशव यांनी पंच म्हणून काम पाहिले. विनीत जोशी यांनी सूत्रसंचालन केले, तर किशोर सिंह यांनी आभार मानले.

 

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या