Thursday, August 13, 2026
Homeखानदेशउत्तर महाराष्ट्र विद्यापीठ मागासवर्गीय संघटनेची नवीन कार्यकारिणी बिनविरोध

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ मागासवर्गीय संघटनेची नवीन कार्यकारिणी बिनविरोध

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ मागासवर्गीय संघटनेची नवीन कार्यकारिणी बिनविरोध

अध्यक्षपदी राजू सोनवणे तर सचिवपदी अरुण सपकाळे यांची निवड

जळगाव: जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ मागासवर्गीय संघटनेची सर्वसाधारण सभा रविवारी, ९ ऑगस्ट २०२६ रोजी राजू सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. या सभेत संघटनेच्या नवीन कार्यकारिणीची सर्वानुमते आणि बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

नवनिर्वाचित कार्यकारिणीत अध्यक्षपदी राजू सोनवणे, सचिवपदी अरुण सपकाळे, कार्याध्यक्षपदी सोमनाथ गोहील, उपाध्यक्षपदी वैशाली वराडे, कोषाध्यक्षपदी राहुल नन्नवरे आणि सहसचिवपदी विठ्ठल धनगर यांची एकमुखाने निवड करण्यात आली. तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून जयंत सोनवणे, मनोज निळे, सुभाष पवार, शंकर गुरले आणि सुनील आढाव यांचा समावेश करण्यात आला आहे.

या सभेत संघटनेच्या आगामी वाटचालीबाबत आणि विविध उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे हक्क, न्याय आणि त्यांच्या विविध प्रलंबित प्रश्ना सोडवण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे कार्य करण्याचा निर्धार सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. नवीन कार्यकारिणीच्या निवडीबद्दल उपस्थित सर्व सदस्यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या