Thursday, July 16, 2026
Homeक्राईमघरफोडी करून ७१ हजारांचा ऐवज लंपास

घरफोडी करून ७१ हजारांचा ऐवज लंपास

घरफोडी करून ७१ हजारांचा ऐवज लंपास

दरवाजाचे कुलूप तोडून रोकड व सोने-चांदीचे दागिने चोरट्यांनी केले गायब

जळगाव | प्रतिनिधी

चाळीसगाव तालुक्यातील खडकेसीम येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत रोख रक्कम आणि सोने-चांदीचे दागिने असा एकूण ७१ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.

ही घटना १३ जुलै रोजी उघडकीस आली. चोरट्यांनी घरातून ६० हजार रुपयांची रोकड तसेच सोने-चांदीचे दागिने चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी मेघराज बाळू बोरसे (वय २९, रा. खडकेसीम, ता. चाळीसगाव) यांनी १४ जुलै रोजी मेहुणबारे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मेहुणबारे पोलीस करीत आहेत.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या