Friday, July 3, 2026
HomeBlogइनरव्हील क्लब ऑफ जळगाव ईस्टतर्फे रुग्णाला जीवनदान

इनरव्हील क्लब ऑफ जळगाव ईस्टतर्फे रुग्णाला जीवनदान

इनरव्हील क्लब ऑफ जळगाव ईस्टतर्फे रुग्णाला जीवनदान

डायलिसिस’चा खर्च व औषधोपचाराची जबाबदारी स्वीकारली

जळगाव । इनरव्हील क्लब ऑफ जळगाव ‎ईस्टतर्फे क्लबच्या नवीन वर्षानिमित्त तसेच डॉक्टर्स डे’चे निमित्त साधत गरजू रुग्णाला ‎डायलिसिससाठी आर्थिक सहाय्य देण्यात‎ आले. यामुळे रुग्णाची जीवनरक्षक थेरपी‎कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहिली. विशेष म्हणजे भविष्यातील डायलिसिसचा खर्च व औषधोपचाराची जबाबदारी देखील क्लबने स्वीकारली आहे.
डॉक्टर दिनाचे औचित्य साधत इनरव्हील क्लबने हा अनोखा उपक्रम राबविला.

हा ‎प्रकल्प म्हणजे अर्थपूर्ण आरोग्यसेवा आणि‎गरजूंच्या पाठीशी उभे राहाण्यासाठी वचनबद्ध‎ असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. शहरातील डॉ. अमित भंगाळे यांच्या रुग्णालयात दाखल असलेल्या एका गरजू रुग्णाच्या डायलिसिसची जबाबदारी क्लबने स्वीकारली आहे. सुरवातीला किमान २० डायलिसीस होतील इतक्या खर्चाचा चेक देण्यात आला असून रुग्णाला औषधी देखील मोफत देण्यात आल्या आहे. भविष्यातील डायलिसीसची जबाबदारी क्लबच्या सदस्यांनी स्वीकारली आहे. यावेळी क्लबच्या अध्यक्ष रितू शर्मा, सचिव पायल जैन, पीडीसी संगीता घोडगावकर, माजी अध्यक्ष सिमरन पाटील, आशा मौर्या, रिटा भल्ला यांसह क्लबच्या सदस्या उपस्थित होत्या.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या