Thursday, July 2, 2026
HomeBlogराजस्थानमध्ये भीषण अपघात; एक्स्प्रेसवेवर स्लीपर बसला आग, ८ ठार

राजस्थानमध्ये भीषण अपघात; एक्स्प्रेसवेवर स्लीपर बसला आग, ८ ठार

राजस्थानमध्ये भीषण अपघात; एक्स्प्रेसवेवर स्लीपर बसला आग, ८ ठार

दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवरील दुर्घटनेत चालकासह ६ प्रवासी जिवंत जळाले; २१ जण जखमी, चार जण बेपत्ता

दौसा (राजस्थान) | वृत्तसंस्था

राजस्थान मधील दौसा येथे दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवर मंगळवारी मध्यरात्री भीषण रस्ता अपघात झाला. या दुर्घटनेत एका स्लीपर बसला आग लागून बस चालकासह सहा प्रवासी जिवंत जळाले, तर इतर दोघांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण आठ जणांचा मृत्यू झाला असून २१ जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ची स्लीपर बस येथून कडे जात होती. बसमध्ये दोन चालक, एक वाहक आणि सुमारे ४० प्रवासी प्रवास करत होते. मध्यरात्रीच्या सुमारास एक्स्प्रेसवेवर बसचा भीषण अपघात झाला आणि त्यानंतर बसने पेट घेतल्याने काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले.

आगीत बस चालकासह सहा प्रवासी जिवंत जळाले, तर अन्य दोघांचा मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले. जखमींना तत्काळ दौसा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, या दुर्घटनेनंतर चार प्रवासी बेपत्ता असल्याची माहिती समोर आली असून प्रशासनाकडून त्यांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू केली असून मृतांची ओळख पटविण्याचे कामही सुरू आहे.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या