Tuesday, May 12, 2026
Homeखानदेशतीन दिवस ‘हीट वेव्ह’चा इशारा!

तीन दिवस ‘हीट वेव्ह’चा इशारा!

तीन दिवस ‘हीट वेव्ह’चा इशारा!

जळगाव जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट; पारा ४६ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता

जळगाव : जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून नागरिक हैराण झाले आहेत. रविवारी दि. ११ मे रोजी जळगावमध्ये कमाल तापमान ४४.३ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. हे तापमान सरासरीपेक्षा तब्बल १.७ अंशांनी अधिक असल्याने शहरासह ग्रामीण भागातही तीव्र उकाडा जाणवत आहे. किमान तापमान २६.५ अंश सेल्सिअस राहिले.

दरम्यान, हवामान विभागाने सोमवार ते बुधवार या कालावधीत जिल्ह्यात ‘हीट वेव्ह’ अर्थात उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा दिला आहे. दि. १२ आणि १३ मे रोजी तापमान ४५ ते ४६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

जळगाव शहरासह भुसावळ परिसरातही उच्चांकी तापमानाची नोंद होत असून दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. वाढत्या उष्णतेमुळे शेतकरी, मजूर, प्रवासी आणि बाहेर काम करणाऱ्या नागरिकांना उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे. बाजारपेठांमध्येही दिवसभर शुकशुकाट दिसून येत असून सायंकाळनंतरच नागरिकांची गर्दी वाढत आहे.

प्रशासनाने नागरिकांना भरपूर पाणी पिणे, थेट उन्हात जाणे टाळणे, डोक्यावर टोपी किंवा कापड वापरणे तसेच आवश्यक असल्यासच बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे.

आठवडाभरातील तापमानाचा आलेख
४ मे – ४३.१ अंश
५ मे – ४३.१ अंश
६ मे – ४३.१ अंश
७ मे – ४२.६ अंश
८ मे – ४२.६ अंश
९ मे – ४२.६ अंश
१० मे – ४४.५ अंश

दरम्यान, १७ मे रोजी अंशतः ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे तापमानात काही प्रमाणात घट होऊन पारा ४१ अंशांपर्यंत खाली येण्याची शक्यता असून नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळू शकतो.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या