Saturday, May 9, 2026
Homeक्राईमसुनेचा खून करून फरार सासऱ्याच्या जळगावात मुसक्या आवळल्या!

सुनेचा खून करून फरार सासऱ्याच्या जळगावात मुसक्या आवळल्या!

सुनेचा खून करून फरार सासऱ्याच्या जळगावात मुसक्या आवळल्या!

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; मेहरूण परिसरात रचला  सापळा

जळगाव : पुणे शहरातील रायकर मळा परिसरात घरगुती वादातून सुनेचा निर्घृण खून करून फरार झालेला सासरा भानुदास भास्कर चौधरी याला जळगाव जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) शिताफीने जेरबंद केले आहे. ही कारवाई ९ मे २०२६ रोजी मेहरूण परिसरातील महादेव मंदिर परिसरात रचलेल्या सापळ्यात पार पडली.

२ मे २०२६ रोजी पुण्यातील रायकर मळा येथे झालेल्या घटनेत आरोपीने आपली सून स्वाती तेजस चौधरी (वय २८) यांच्या डोक्यात घातक वार करून त्यांचा खून केला होता. त्यानंतर आरोपीने घराला बाहेरून कुलूप लावून फरार होण्याचा प्रयत्न केला. घरात लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

या प्रकरणी पुण्यातील नांदेड सिटी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपीचा शोध घेत असताना जळगाव एलसीबीला गोपनीय माहिती मिळाली की तो मेहरूण परिसरात लपून बसला आहे. माहितीची खात्री करून पोलिसांनी तातडीने सापळा रचत आरोपीला अटक केली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात पार पडली.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सफौ अतुल वंजारी, पोहेकों विजय पाटील, अकरम शेख, नितीन बाविस्कर, प्रविण भालेराव, मुरलीधर धनगर, राहुल रगडे, रविंद्र कापडणे, प्रदीप चौरे यांचा सहभाग होता.

या धडाकेबाज कारवाईमुळे पुणे पोलिसांच्या तपासाला मोठा दिलासा मिळाला असून आरोपीला पुढील चौकशीसाठी ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या