Saturday, May 9, 2026
Homeजळगाव जिल्हातामिळनाडूत सत्ता स्थापनेचा पेच संपला; थलपती विजय मुख्यमंत्रीपदी

तामिळनाडूत सत्ता स्थापनेचा पेच संपला; थलपती विजय मुख्यमंत्रीपदी

तामिळनाडूत सत्ता स्थापनेचा पेच संपला; थलपती विजय मुख्यमंत्रीपदी

काँग्रेससह मित्रपक्षांचा पाठिंबा; आज घेणार शपथ

चेन्नई | प्रतिनिधी तामिळनाडूच्या राजकारणात मोठी राजकीय घडामोड घडली असून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार थलपती विजय हे राज्याचे नवे मुख्यमंत्री बनणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसच्या मध्यस्थीने बहुमतासाठी आवश्यक असलेले ११८ आमदारांचे समर्थन मिळाल्यानंतर सत्ता स्थापनेचा पेच अखेर सुटला आहे.

विधानसभा निवडणुकीत १०७ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाचे संस्थापक विजय यांनी शुक्रवारी संध्याकाळी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा केला. यावेळी त्यांनी काँग्रेस, भाकप, माकप आणि व्हीसीके या पक्षांच्या आमदारांच्या समर्थनपत्रांसह ११८ आमदारांचा पाठिंबा असल्याचे राज्यपालांना सादर केले.

बहुमताचा आकडा पार केल्यानंतर राज्यपालांनी विजय यांना सरकार स्थापन करण्यासाठी हिरवा कंदील दिला असून ते शनिवारी सकाळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

तामिळनाडूमध्ये सरकार स्थापनेबाबत गेल्या काही दिवसांपासून मोठा सस्पेन्स निर्माण झाला होता. मात्र अखेर विजय यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन होणार असल्याचे निश्चित झाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. चेन्नईसह राज्यभरात टीव्हीके कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जात असून विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या