Tuesday, May 5, 2026
Homeक्राईमजळगाव पोलिसांची धडक कारवाई : २१३ हॉटेल-ढाब्यांची तपासणी; ११६ ठिकाणी अवैध मद्यविक्री...

जळगाव पोलिसांची धडक कारवाई : २१३ हॉटेल-ढाब्यांची तपासणी; ११६ ठिकाणी अवैध मद्यविक्री उघड

जळगाव पोलिसांची धडक कारवाई : २१३ हॉटेल-ढाब्यांची तपासणी; ११६ ठिकाणी अवैध मद्यविक्री उघड

४७ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई; तलवार बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल, दोन गाड्या नष्ट

जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने धडक मोहीम राबवत २१३ हॉटेल, बार व ढाब्यांची सखोल तपासणी केली. या कारवाईदरम्यान तब्बल ११६ ठिकाणी अवैध मद्यविक्री सुरू असल्याचे उघडकीस आले. यामुळे संबंधितांवर कारवाई करण्यात आली असून ४७ संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांच्या तपासात असे आढळले की, अनेक गुन्हेगार रात्रीच्या वेळी बार व ढाब्यांवर एकत्र येऊन गुन्ह्यांचे नियोजन करतात. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार २ मे रोजी रात्री ९ ते ११ या वेळेत विशेष सर्च ऑपरेशन राबविण्यात आले.

या मोहिमेत हॉटेल्स, बार, ढाब्यांसह खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या गाड्यांवरही छापे टाकण्यात आले. चाळीसगाव व भडगाव येथे मद्यपान करताना आढळलेल्या दोन खाद्यगाड्या थेट नष्ट करण्यात आल्या.

मद्यधुंद वाहनचालकांवरही कारवाई

या कारवाईदरम्यान मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या एका चालकावर ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ अंतर्गत कारवाई करण्यात आली. तसेच वाहन परवाना नसणे, अतिवेग आदी कारणांवरून पाच वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.

वेळेचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्सवर दंडात्मक कारवाई

तपासणीदरम्यान ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ सुरू असलेल्या चार हॉटेल्सवरही कारवाई करण्यात आली. तसेच एका व्यक्तीवर अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. एका तरुणाकडे तलवार आढळून आल्याने त्याच्याविरुद्धही गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या