Thursday, May 7, 2026
HomeBlogभवानी फाट्याजवळ फटाका कारखान्यात भीषण आग

भवानी फाट्याजवळ फटाका कारखान्यात भीषण आग

भवानी फाट्याजवळ फटाका कारखान्यात भीषण आग

अग्निशमन दलच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

जळगाव : भवानी फाट्याजवळील मकरा फटाका कारखान्यात अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. आगीचे स्वरूप काही वेळातच तीव्र झाले होते; मात्र अग्निशमन दल व स्थानिक यंत्रणेच्या तात्काळ प्रतिसादामुळे मोठा अनर्थ टळल्याची माहिती समोर आली आहे.

आग विझवण्यासाठी कर्मचारी व वाहन चालक देविदास सुरवाडे, प्रकाश चव्हाण यांनी धाडसाने मदत केली. तसेच फायरमन वृषभ सुरवाडे, ललित पाटील, यश मनोरे, भुषण पाटील आणि संजय तायडे यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी मोलाचे योगदान दिले.

या बचाव कार्यात जामनेर नगरपालिकेच्या अग्निशमन गाड्यांसह शेंदुर्णी ग्रामपंचायतीच्या वाहनांनीही सहकार्य केले. सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे आग नियंत्रणात आणण्यात यश आले.

दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही; मात्र घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या