Wednesday, April 29, 2026
HomeBlogगॅस सिलेंडर चोरणारी टोळी जाळ्यात , ४.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त

गॅस सिलेंडर चोरणारी टोळी जाळ्यात , ४.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त

गॅस सिलेंडर चोरणारी टोळी जाळ्यात , ४.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त

​फैजपूर आणि वरणगावमधील दोन मोठे गुन्हे उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

​जळगाव | प्रतिनिधी जिल्ह्यात गॅस एजन्सीच्या गोदामांना लक्ष्य करून गॅस सिलेंडरची चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ३ सराईत आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून चोरी केलेले १५७ गॅस सिलेंडर आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, असा एकूण ४ लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

​नेमकी घटना काय?
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात गॅस सिलेंडर चोरीच्या घटनांनी खळबळ उडाली होती.
फैजपूर येथील २५ एप्रिल २०२६ रोजी श्रीधर गॅस एजन्सीच्या गोदामातून ३ लाख १९ हजार ८०० रुपये किमतीचे १०० गॅस सिलेंडर अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून लांबवले होते. वरणगाव येथे २६ फेब्रुवारी २०२६ रोजी भारत गॅस एजन्सीच्या गोदामातून ७२ हजार ८४६ रुपये किमतीचे ५७ सिलेंडर चोरीला गेले होते.
या दोन्ही घटनांमुळे गॅस एजन्सी चालकांमध्ये भीतीचे वातावरण होते.

​पोलिसांनी असा लावला छडा
गुन्ह्यांचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना तपासाचे आदेश दिले होते. एलसीबीच्या दोन वेगवेगळ्या पथकांनी गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयास्पद वाहनांचा मागोवा घेतला. तपासादरम्यान पोलिसांनी कासोदा, तांबापुरा आणि नशिराबाद भागातून ३ संशयितांना ताब्यात घेतले.

यात शेख बिलाल शेख नवी (वय ३२, रा. कासोदा, एरंडोल),वसीम खान शाबीर खान (वय ३१, रा. तांबापुरा, जळगाव),चेतन सुरेश काळे (वय ३८, रा. नशिराबाद, भुसावळ) असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे असून ​या आरोपींची सखोल चौकशी केली असता, त्यांनी आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने हे दोन्ही गुन्हे केल्याची कबुली दिली.

​जप्त केलेला मुद्देमाल:
​भारत गॅस कंपनीचे भरलेले ६२ सिलेंडर (किंमत १,५५,०००/-) ​भारत गॅस कंपनीचे रिकामे ९५ सिलेंडर (किंमत १,४२,५००/-)
​गुन्ह्यात वापरलेली सुझुकी मोपेड (क्र. MH 19 ELL 8871) एकूण किंमत: ४,२७,५००/- रुपये.

​तपास पथकाची कामगिरी
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर आणि केदार वारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, उपनिरीक्षक सोपान गोरे, प्रितम पाटील, प्रेमचंद सपकाळे, सलीम तडवी, उमाकांत पाटील, यशवंत टहाकळे, श्रीकृष्ण देशमुख, बबन पाटील, सचिन पुगे, प्रदीप सपकाळे, मयुर निकम, गौरव पाटील आणि मिलिंद जाधव यांचा समावेश होता. ​अटक केलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी फैजपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सैय्यद आणि विनोद गाभणे अधिक तपास करत आहेत.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या