Thursday, May 7, 2026
Homeजळगाव जिल्हाबग्गीतून निघालेल्या जयश्री महाजन यांच्या प्रचार फेरीचे जळगावकरांना अप्रूप

बग्गीतून निघालेल्या जयश्री महाजन यांच्या प्रचार फेरीचे जळगावकरांना अप्रूप

जळगाव ; शहर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री महाजन यांचा प्रचार दौऱ्याचा धडाका सुरु असून, त्यांचा प्रचार दौरा ज्या भागात असतो त्या भागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादासह प्रचार रॅलीत सहभागही आता जाणवू लागला आहे. जयश्री महाजन यांच्या प्रचाराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या प्रचारातील नावीन्य. या नावीन्याचीच जळगावकरांना अधिक अपूर्वाई वाटत आहे.
जळगावकरांचे प्रश्न होर्डिंगच्या माध्यमातून मांडणे असो की प्रचार फेरी सुरु असतांना, समोर आलेला एखादा लहानगा असो. प्रत्येकाशी जयश्री महाजन या संवाद साधत आहेत. त्यांच्या एकंदरीत वागण्या बोलण्यावरून त्यांची जळगावकरांशी असलेली जवळीक व संवाद साधण्याची हातोटी अधोरेखित होत आहे. प्रभाग क्रमांक ११ मधून काढण्यात आलेली प्रचार फेरीत समर्थकांनी जयश्री महाजन यांचा प्रचार सुरु होण्याप्रसंगी बग्गी आणून त्यातून संपूर्ण प्रभागात जयश्री महाजन यांची प्रचार फेरी पूर्ण केली. या बग्गीतून प्रचार करण्याच्या नावीन्याचेही जळगावकरांना अपूर्वाई वाटली.
या सर्वातून नावीन्यपूर्ण विचार मांडण्याच्या जयश्री महाजन यांच्या कौशल्याचे जळगावकर कौतुक करत असून, त्यांच्या प्रचार दौऱ्याला आता जळगावकरांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या