Friday, April 24, 2026
Homeजळगाव जिल्हामाजी महापौर ललित कोल्हे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन; 'कॉल सेंटर' छापेमारी प्रकरणी...

माजी महापौर ललित कोल्हे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन; ‘कॉल सेंटर’ छापेमारी प्रकरणी मोठा दिलासा

माजी महापौर ललित कोल्हे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन; ‘कॉल सेंटर’ छापेमारी प्रकरणी मोठा दिलासा

​जळगाव | प्रतिनिधी शहरानजीक असलेल्या ममुराबाद रोडवरील एल. के. फार्महाऊसवर झालेल्या पोलीस छापेमारी प्रकरणी गेल्या अनेक महिन्यांपासून कारागृहात असलेले जळगावचे माजी महापौर ललित कोल्हे यांना अखेर सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. दीर्घ कायदेशीर लढाईनंतर कोल्हे यांना हा मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्या पत्नी सरिता माळी-कोल्हे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

काय आहे प्रकरण?
काही महिन्यांपूर्वी जळगाव पोलिसांनी ममुराबाद रोडवरील ललित कोल्हे यांच्या मालकीच्या फार्महाऊसवर धाड टाकली होती. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्तरावरील बेकायदेशीर कॉल सेंटर चालवून परदेशी नागरिकांची ऑनलाइन फसवणूक केली जात असल्याचा खळबळजनक ठपका पोलिसांनी ठेवला होता. या कारवाईत ललित कोल्हे यांच्यासह कोलकाता येथील चार संशयित आणि इतर अशा एकूण आठ जणांना पोलिसांनी अटक केली होती. तपासाधिकारी उपअधीक्षक नितीन गणापुरे यांनी न्यायालयात हा ‘संघटित गुन्हेगारी’चा प्रकार असल्याचे सांगत पोलिसांची बाजू भक्कमपणे मांडली होती.


या गुन्ह्यात अटक झाल्यापासून ललित कोल्हे हे नाशिक मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत होते. यापूर्वी जिल्हा न्यायालय आणि उच्च न्यायालय या दोन्ही ठिकाणी त्यांचे जामीन अर्ज फेटाळण्यात आले होते. त्यामुळे कोल्हे यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोल्हे यांचा जामीन अर्ज मंजूर केला.

समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण

गेल्या अनेक महिन्यांपासून कोल्हे कारागृहात असल्याने त्यांचे राजकीय भवितव्य आणि कुटुंबासमोर कायदेशीर पेच निर्माण झाला होता. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये आणि कुटुंबीयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. जामिनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ललित कोल्हे लवकरच कारागृहाबाहेर येण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आले आहे..

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या