Wednesday, February 4, 2026
Homeजळगाव जिल्हाराज्यातील २९ महानगरपालिकांसाठी आज मतदान

राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी आज मतदान

राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी आज मतदान

३ कोटी ४८ लाखांहून अधिक मतदारांचा सहभाग; उद्या मतमोजणी

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज, गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडत असून सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. या निवडणुकीत राज्यभरातील एकूण २,८६९ जागांसाठी मतदान होत असून तब्बल ३ कोटी ४८ लाख ७९ हजार ३३७ मतदार आपला कौल नोंदवणार आहेत.
निवडणूक शांततेत आणि सुरळीत पार पडावी यासाठी राज्यभरात ३९ हजार ९२ मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. या केंद्रांवर आवश्यक सुरक्षा व्यवस्था व प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. या निवडणुकीत विविध पक्षांचे व अपक्ष असे मिळून १५ हजार ९०८ उमेदवार रिंगणात आहेत.
मुंबई महानगरपालिका वगळता राज्यातील उर्वरित सर्व महानगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना लागू आहे. बहुतांश प्रभाग हे चार सदस्यीय असून काही प्रभाग तीन किंवा पाच सदस्यीय आहेत. त्यामुळे प्रभागातील सदस्यसंख्येनुसार मतदारांना तितकी मते द्यावी लागणार आहेत. यासाठी ईव्हीएमवर चार वेगवेगळ्या रंगांच्या मतपत्रिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, या निवडणुकीचा निकाल शुक्रवार, १६ जानेवारी रोजी जाहीर होणार असून राज्यातील शहरी राजकारणाची दिशा या निकालातून स्पष्ट होणार आहे. प्रशासन व पोलिस यंत्रणा संपूर्ण प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

ताज्या बातम्या