Wednesday, February 4, 2026
Homeजळगाव जिल्हाप्रभाग ७ मध्ये भगवे वादळ ; भव्य पदयात्रेतून चंद्रशेखर अत्तरदे यांचे जोरदार...

प्रभाग ७ मध्ये भगवे वादळ ; भव्य पदयात्रेतून चंद्रशेखर अत्तरदे यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

प्रभाग ७ मध्ये भगवे वादळ ; भव्य पदयात्रेतून चंद्रशेखर अत्तरदे यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

जळगाव प्रतिनिधी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग ७ मध्ये राजकीय वातावरण प्रचंड तापले असून, भाजपचे अधिकृत उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या भव्य प्रचार रॅलीने आज संपूर्ण परिसरात ‘भगवे वादळ’ निर्माण केले. गणेश कॉलनीसह प्रभागातील विविध भागांत या रॅलीला मतदारांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. यावेळी अत्तरदे यांच्यासोबतच भाजपच्या पॅनलमधील उमेदवार दीपमाला काळे, अंकिता पाटील आणि विशाल भोळे यांनी एकजुटीने सहभागी होत आपल्या विजयाचा निर्धार व्यक्त केला. ठिकठिकाणी सोसायट्यांमध्ये महिलांनी उमेदवारांचे औक्षण करत विजयाचा टिळा लावला, तर फुलांच्या उधळणीने संपूर्ण मार्ग सुशोभित झाला होता. विशेषतः तरुणांचा उत्साह आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

प्रचारादरम्यान मतदारांशी संवाद साधताना चंद्रशेखर अत्तरदे यांनी विकासाचा अजेंडा स्पष्ट केला. ते म्हणाले की, “प्रभागातील रस्ते, नियमित पाणीपुरवठा आणि स्वच्छता या मूलभूत प्रश्नांना आमचे प्रथम प्राधान्य असेल. केंद्र आणि राज्य सरकारच्या जनहितकारी योजनांचा लाभ प्रभागातील प्रत्येक वंचितापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही बांधील आहोत.” मतदारांनीही यावेळी “प्रभागाच्या प्रलंबित प्रश्नांसाठी भाजप हाच सक्षम पर्याय” असल्याची भावना व्यक्त केली. मतदारांचा हा वाढता ओघ विजयाची नांदी असल्याचे अत्तरदे यांनी नमूद केले. या रॅलीच्या यशस्वीतेसाठी चेतन तिवारी, मयूर भोळे, पंकज पाटील, मनोज काळे यांच्यासह भाजपचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेतली.

ताज्या बातम्या