Thursday, February 5, 2026
Homeखानदेशसलग १८ वर्षांची आरोग्य व भक्तीची परंपरा ; हरि ॐ मॉर्निंग वॉक...

सलग १८ वर्षांची आरोग्य व भक्तीची परंपरा ; हरि ॐ मॉर्निंग वॉक ग्रुपची तरसोद पायी वारी

सलग १८ वर्षांची आरोग्य व भक्तीची परंपरा ; हरि ॐ मॉर्निंग वॉक ग्रुपची तरसोद पायी वारी

जळगाव प्रतिनिधी शारीरिक व मानसिक आरोग्याच्या तंदुरुस्तीसाठी स्थापन करण्यात आलेल्या हरि ॐ माॅर्निंग वाॅक गृपच्या माध्यमातून दरवर्षी तरसोद पायीवारीचे आयोजन करण्यात येते. पायीवारीचे हे १८वे वर्ष होते.

सकारात्मकता व जीवनातील आनंदासाठी हरि ॐ मॉर्निंग गृप नियमीतपणे अनेकविध उपक्रम राबवित असतो. सकाळी पायी फिरण्यासोबतच व्यायाम, प्राणायाम केले जातात. गतवर्षातील सुख-समाधान व आनंदासाठी कृतज्ञता व्यक्त करणे तसेच येणाऱ्या नवीन वर्षात गणरायाने आशीर्वाद द्यावा यासाठीची प्रार्थना करण्यासाठी तरसोद पायी वारीचे आयोजन करण्यात येते.

सकाळी ६ वाजता गणपती नगरातील गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन पुढे शहरातील विविध भागातील सदस्य पायी चालत अजिंठा चौफुली येथे एकत्रित येऊन व तेथून गणपती बाप्पा मोरया असा गजर करीत तरसोद पायीवारीची सुरुवात झाली. गोदावरी इंजिनिअरिंग काॅलेजजवळ चहापान करुन वारी पुढे मार्गस्थ झाली. रस्त्याने चालताना दोन-चार जणांच्या गटात सर्व सदस्य शिस्तीत चालत होते. त्यामुळे रस्त्यावर गर्दी होत नव्हती. चालताना गणपती बाप्पा मोरया व हरि ॐ चा गजर सुरु होता. गणपती मंदिरात पोहोचल्यावर सामुहिक प्रार्थना व त्यानंतर अल्पोपहार करुन उपक्रमाची उत्साहात सांगता झाली.

यावर्षीच्या पायी वारीत सुरेश प्रीतमणि, राजेश हिंगु, राजू कोचर, राजेश जेवलानी, नविन आमलानी, जानीभाई कटारिया, शंकर मंधान, घन:श्याम अडवाणी, संजय हेमनानी, हासानंद मंधान, राजेश बूटवानी, विनोद मराठे, जितेंद्र हिंगु, राकेश वालेचा, नंदकुमार जयस्वाल, प्रदीप करमचंदानी, उमेश साहित्या, मुकेश वाधवाणी, राजू नेमाडे, प्रकाश नागदेव, भारत कपूर, ऋषि कपूर, अरुण निकुंभ, हेमंत कोल्हे, संदीप हेमनानी, प्रणिल हिंगु, गिरीश कुळकर्णी आदी सहभागी होते.

ताज्या बातम्या