Thursday, April 30, 2026
Homeखानदेशशिवसेनेत शेख शब्बीर शेख नजीर कुरेशी यांची अल्पसंख्यांक उपजिल्हाप्रमुखपदी नियुक्ती

शिवसेनेत शेख शब्बीर शेख नजीर कुरेशी यांची अल्पसंख्यांक उपजिल्हाप्रमुखपदी नियुक्ती

शिवसेनेच्या अल्पसंख्यांक उपजिल्हाप्रमुखपदी शेख शब्बीर शेख नजीर कुरेशी यांची  नियुक्ती
बुलढाणा प्रतिनिधी शिवसेना पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने अल्पसंख्यांक आघाडीमध्ये महत्त्वाची नियुक्ती करण्यात आली असून, बुलढाणा तालुका व जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले शेख शब्बीर शेख नजीर कुरेशी, रा. बुलढाणा, ता. जि. बुलढाणा यांची शिवसेना पक्षाच्या अल्पसंख्यांक उपजिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती शिवसेनेचे नेते तथा आमदार संजय  गायकवाड यांनी जाहीर केली आहे.
नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे की, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व त्यांच्या हिंदुत्वाच्या विचारातून प्रेरणा घेऊन शेख शब्बीर शेख नजीर कुरेशी हे पक्षवाढीसाठी कार्य करतील, तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या शिकवणीचा प्रचार व प्रसार अल्पसंख्यांक समाजात प्रभावीपणे करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

शिवसेनेची विचारधारा, संघटनात्मक शिस्त आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारी भूमिका यामुळे पक्षाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असून, या नियुक्तीमुळे बुलढाणा जिल्ह्यात अल्पसंख्यांक समाजात शिवसेनेचे बळ अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पक्ष संघटन वाढीसाठी सर्व घटकांना सोबत घेऊन कार्य करण्याची जबाबदारी नव्याने नियुक्त पदाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे.

या नियुक्तीबद्दल शिवसेना कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त करत शेख शब्बीर शेख नजीर कुरेशी यांचे अभिनंदन केले असून, त्यांनीही पक्ष नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेनेच्या विचारधारेनुसार प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही दिली आहे.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या