Thursday, May 7, 2026
Homeक्राईमभरधाव वाहनाच्या धडकेत १८ वर्षीय दुचाकीस्वार तरुण ठार

भरधाव वाहनाच्या धडकेत १८ वर्षीय दुचाकीस्वार तरुण ठार

भरधाव वाहनाच्या धडकेत १८ वर्षीय दुचाकीस्वार तरुण ठार

जळगाव : मावशीकडे आलेल्या तरुणाला भरधाव वाहनाने धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रेम उर्फ जयपाल चरणसिंग पाटील (वय १८, रा. लोंढरी, ता. जामनेर, ह.मु. वाळूज, छत्रपती संभाजी नगर) याचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला. ही घटना दि. २३ रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास सुप्रिम कॉलनीजवळ घडली. धडक दिल्यानंतर वाहन चालक तेथून पसार

झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जामनेर तालुक्यातील लोंढरी येथील रहिवासी असलेला जयपाल पाटील हा आपल्या कुटुंबासह सध्या छत्रपती संभाजीनगर येथील एमआयडीसी वाळूज परिसरात वास्तव्यास होता. नुकताच तो बारावीची परिक्षा उत्तीर्ण होवून महाविद्यालयात शिक्षण घेत होता. काही दिवसांपूर्वी त्याच्या आजीचे निधन झाल्यामुळे, जयपाल त्याच्या आई-वडील आणि बहिणीसोबत वास्तव्याला होता.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या