भुसावळ नमोमय : ‘नमो युवा रन २०२५’ उत्साहात संपन्न
भुसावळ (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने “नशामुक्त भारत” या संदेशासाठी आयोजित नमो युवा रन २०२५ मॅरेथॉन भुसावळ शहरात उत्साहात पार पडली. या स्पर्धेत हजारो युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत शहराचे वातावरण नमोमय केले.
मॅरेथॉनमध्ये चार गट ठेवण्यात आले होते – खुला पुरुष गट, खुला महिला गट, शालेय मुलांचा गट आणि शालेय मुलींचा गट. रेल्वे ग्राऊंड येथून सुरू झालेला तीन किलोमीटरचा हा दौडमार्ग हंबर्डीकर चौक, लोखंडी पूल, शिवाजी कॉम्प्लेक्स, पांडुरंग टॉकीज, मोटुसोबराज चौक असा होता.
कार्यक्रमाचे उद्घाटन क्रीडा ज्योत पेटवून आणि बलून सोडून केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते झाले. यावेळी मंडळ रेल्वे प्रबंधक सुनील कुमार सुमन, आर.के. मीना, चित्रेश जोशी, चंद्रकांत बाविस्कर, केतकी पाटील, परीक्षित बऱ्हाटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
🏆 स्पर्धेतील विजेते
पुरुष गट : प्रथम – प्रतीक सोनवणे, द्वितीय – आदित्य जाधव, तृतीय – लकी खरारे
महिला गट : प्रथम – रेणुका धनगर, द्वितीय – गायत्री माळी, तृतीय – अश्विनी रोझोदे
शालेय मुलं : प्रथम – निलेश इंगळे, द्वितीय – रोहित बावणे, तृतीय – योगेश शिरसाळे
शालेय मुली : प्रथम – पूर्वा बाविस्कर, द्वितीय – हर्षाली वाणी, तृतीय – राखी महाजन
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉ. प्रदीप साखरे, विलास पाटील, मनोज वारके, मेघश्याम शिंदे, मुकेश मोरे यांच्यासह क्रीडा शिक्षक महासंघ, तालुका अॅथलेटिक्स असोसिएशन, रेल्वे अधिकारी व शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमन भोळे व डॉ. प्रदीप साखरे यांनी केले.