Saturday, October 4, 2025
Homeक्राईमजळगावात मेहरुण बगीचात एमडी ड्रग्ससह एकाला अटक, दुसरा फरार

जळगावात मेहरुण बगीचात एमडी ड्रग्ससह एकाला अटक, दुसरा फरार

जळगावात मेहरुण बगीचात एमडी ड्रग्ससह एकाला अटक, दुसरा फरार

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

जळगाव प्रतिनिधी I  शहरातील मेहरुण बगीचा परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने मोठी कारवाई करत ड्रग्स विक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास रचलेल्या सापळ्यात पोलिसांनी मोहम्मद हनीफ पटेल (वय ३५, रा. मास्टर कॉलनी) याला ६ ग्रॅम एमडी ड्रग्ससह रंगेहाथ पकडले, तर त्याचा साथीदार पळ काढण्यात यशस्वी झाला. या कारवाईत पोलिसांनी ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून, एमआयडीसी

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांची खास मोहीम, ड्रग्स माफियांना चाप
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी ड्रग्स माफियांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार, एलसीबीचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुप्त माहितीच्या आधारे मेहरुण बगीचातील जे.के.पार्कजवळील जुन्या स्विमिंग टॅंक परिसरात सापळा रचला.  पोलिसांनी मोहम्मद हनीफ पटेल याला ताब्यात घेतले. मात्र, त्याचा साथीदार पसार झाला.

६० हजारांचे एमडी ड्रग्स जप्त
एलसीबी पथकाने मोहम्मद हनीफकडून ६ ग्रॅम एमडी ड्रग्स पावडर (किंमत ६० हजार) आणि दोन मोबाइलसह एकूण ८२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. पोलीस हवालदार अक्रम शेख यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके आणि कर्मचारी योगेश घुगे करत आहेत.

ताज्या बातम्या