Thursday, May 7, 2026
Homeजळगाव जिल्हाजळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदावर सुनील महाजनांची निवड

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदावर सुनील महाजनांची निवड

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदावर सुनील महाजनांची निवड

जळगाव : जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत माजी उपमहापौर सुनील महाजन यांनी १५ विरुद्ध २ मतांनी विजय मिळवत बाजी मारली. त्यांच्या विरोधात शेवटच्या क्षणी उभे राहिलेले लक्ष्मण गंगाराम पाटील उर्फ ‘लकी टेलर’ यांना  पराभवाचा सामना करावा लागला.

काही दिवसांपूर्वी माजी सभापती श्यामकांत सोनवणे यांच्या विरोधात १८ पैकी १४ सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल करत राजकीय वातावरण तापवले होते. त्यानंतर प्रस्तावाला सामोरे जाण्याआधीच सोनवणे यांनी राजीनामा दिला आणि रिक्त झालेल्या सभापतीपदासाठी आज विशेष सभेचे आयोजन झाले.

या निवडणुकीत सभापतीपदासाठी सुनील महाजन, मनोज दयाराम चौधरी व लक्ष्मण पाटील हे उमेदवार होते. मात्र मनोज चौधरी यांनी माघार घेतल्याने लढत महाजन विरुद्ध पाटील अशी रंगली. मतदानात महाजन यांना तब्बल १५ मते, तर पाटील यांना फक्त २ मते मिळाली.

दरम्यान, उपसभापतीपदासाठी गोकुळ चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. निकाल जाहीर होताच महाजन यांच्या समर्थकांनी ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष केला. दुसरीकडे, पराभवामुळे ‘लकी टेलर’ म्हणून प्रसिद्ध असलेले लक्ष्मण पाटील यांना पुन्हा एकदा सभापतीपद हुकल्याची हुलकावणी मिळाली.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या