नऊ पोलीस अंमलदारांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांचे आदेश
जळगाव – जिल्ह्यातील नऊ पोलीस अंमलदारांची बदली आर्थिक गुन्हे शाखेत करण्यात आली आहे. दि. १८ रोजी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी याबाबतचे आदेश काढले असून बदलीच्या या आदेशामुळे जिल्ह्यातील पोलीस दलात हलकल्लोळ माजला आहे.
बदली झालेल्यांमध्ये शहर पोलीस ठाण्यातील सफौ विजय निकुंभ, बोदवड येथील पोहेकॉ सचिन चौधरी, शहर पोलीस ठाण्यातील सुनिल बडगुजर, पोलीस मुख्यालयातील शैलेश चव्हाण, सावदा येथील किरण पाटील, जिविशा येथील संजय भालेराव, पोलीस मुख्यालयातील विशला तायडे, जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील विकास पहूरकर आणि चाळीसगाव ग्रामीण येथील नवल हटकर यांचा समावेश आहे