Wednesday, July 30, 2025
Homeक्राईमजळगावात तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणाला अटक

जळगावात तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणाला अटक

जळगावात तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणाला अटक

जळगाव l प्रतिनिधी सम्राट कॉलनी परिसरात गुरुवारी, १२ जून २०२५ रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास २२ वर्षीय धीरज दत्ता हिवराळे या तरुणाने हातात तलवार घेऊन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने कारवाई करत त्याला तलवारसह अटक केली.वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपीला ताब्यात घेतले. धीरजवर यापूर्वी दोन गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वात पो. उपनिरीक्षक शरद बागल, सफौ. अतुल वंजारी, पोहेकॉ. प्रविण भालेराव, अक्रम शेख, विजय पाटील, हरीलाल पाटील, किशोर पाटील, प्रदीप चवरे आणि रविंद्र कापडणे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

ताज्या बातम्या