Thursday, May 7, 2026
Homeक्राईमदुचाकी चोरणाऱ्या दोन सराईतांना अटक ; एलसीबीच्या पथकाची कारवाई

दुचाकी चोरणाऱ्या दोन सराईतांना अटक ; एलसीबीच्या पथकाची कारवाई

दुचाकी चोरणाऱ्या दोन सराईतांना अटक ; एलसीबीच्या पथकाची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) :पिंप्राळा हुडको परिसरातून चोरलेली मोटारसायकल प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत दोन सराईत आरोपींना अटक केली  आहे.

नईम खान मुकीम खान (रा. पिंप्राळा, हुडको, जळगाव) यांची मोटरसायकल 24 मे 2025 रोजी चोरीला गेल्यानंतर, रामानंदनगर पोलीस ठाण्यात गु.र. क्र. 206/2025 अन्वये भारतीय दंड विधान (BNS) कलम 303(2) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास LCB जळगाव पथकाकडून सुरू असताना, गुप्त बातमीदारामार्फत अझहरूद्दीन सलीम शेख (वय 19, रा. पिंप्राळा, सध्या पाळधी, ता. धरणगाव) हा संशयित असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, 6 जून 2025 रोजी राबविण्यात आलेल्या शोधमोहीमेदरम्यान अझहरूद्दीन यास ताब्यात घेण्यात आले.

प्राथमिक चौकशीत त्याने, हा गुन्हा त्याच्या साथीदारासह केल्याची कबुली दिली. त्याचा साथीदार अब्रार हमीद खाटीक (वय 20, रा. उमर कॉलनी, उस्मानिया पार्क, जळगाव) याचे नाव पुढे आले. अब्रार याला तुरुंगातून सुटताच पोलिसांनी ताब्यात घेतले असून, दोन्ही आरोपींसह चोरीस गेलेला मुद्देमाल रामानंदनगर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक रेवानंद साळुंखे हे करीत आहेत.
हि कारवाई कामगिरी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, तसेच उपविभागीय अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, उपनिरीक्षक शरद बागल, पोहेकॉ. हरिलाल पाटील, प्रवीण भालेराव, रवींद्र कापडणे यांनी संयुक्तपणे केली. अटक करण्यात आलेले आरोपी हे सराईत व संघटित गुन्हेगारीमध्ये सक्रिय असून, त्यांच्याकडून इतर गुन्ह्यांचा तपास लावण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या