Sunday, September 20, 2026
Homeजळगाव जिल्हाखर्दे येथे वीज पडून बैल ठार, सालदार भाजला; लोंढवे येथे वादळी वाऱ्याने...

खर्दे येथे वीज पडून बैल ठार, सालदार भाजला; लोंढवे येथे वादळी वाऱ्याने लिंबू बागा उद्ध्वस्त

खर्दे येथे वीज पडून बैल ठार, सालदार भाजला; लोंढवे येथे वादळी वाऱ्याने लिंबू बागा उद्ध्वस्त

अमळनेर,  : खर्दे येथील पोलीस पाटील संभाजी पाटील यांच्या शेतात सायंकाळी वीज कोसळून एक बैल जागीच ठार झाला असून तीन गुरे गंभीर जखमी झाली आहेत. या दुर्घटनेत सालदारही गंभीर भाजला आहे. दुसरीकडे लोंढवे येथे आलेल्या वादळी वाऱ्यामुळे लिंबू बागांचे मोठे नुकसान झाले आहे.

खर्दे येथे सोमवारी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास अचानक पाऊस व वीज पडण्याचा प्रकार घडला. शेतात कुट्टी मशीनवर काम सुरू असताना पाऊस सुरू झाल्याने सालदार गाड्याखाली बसला होता. त्यावेळी गाड्याला पाच गुरे बांधलेली होती. विजेच्या जबर धक्क्याने एक बैल जागीच ठार झाला तर इतर तीन गुरे जखमी झाली. या घटनेत सालदार राहुल राजेंद्र बारेला गंभीर भाजल्यामुळे डोळ्यांना अंधारी येत असल्याची तक्रार आहे. त्याला ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर नर्मदा फाउंडेशन रुग्णालयात हलवण्यात आले आहे. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीभाऊ पाटील व मुकेश साळुंखे यांनी भेट दिली.

दरम्यान, लोंढवे गावात १२ मे रोजी आलेल्या प्रचंड वादळी वाऱ्यामुळे शेतकरी संजीव नामदेव पाटील (गट क्र. ३१२) व सुमनबाई नामदेव पाटील (गट क्र. ३१५) यांच्या लिंबू बागांतील सुमारे १०० झाडे उन्मळून पडली. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, फळबाग योजनेंतर्गत शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या