Thursday, April 30, 2026
Homeखानदेशजागतिक पृथ्वी दिनानिमित्त वृक्षारोपण

जागतिक पृथ्वी दिनानिमित्त वृक्षारोपण

जागतिक पृथ्वी दिनानिमित्त वृक्षारोपण

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचा उपक्रम

जळगाव डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी मधील कम्युनिटी फिजिओथेरपी विभागातर्फे जागतिक पृथ्वी दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमात प्राचार्य डॉ. जयवंत नागूलकर, प्रशासकीय अधिकारी राहुल गिरी, तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत वृक्षारोपण मोहीम राबवली. पर्यावरणाचे संरक्षण, हरित परिसराची जपणूक, तसेच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणे हा उददेश डोळयासमोर ठेवून प्राचार्य डॉ. जयवंत नगूलकर यांनी पर्यावरणाचे आरोग्य आणि व्यक्तीचे आरोग्य यांचा संबंध स्पष्ट करताना, समाजात सकारात्मक बदल घडवण्याच्या दृष्टीने अशा उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्याचे महत्त्व सांगितले. यावेळी परिसरात ५० वृक्षाची लागवड करून जतन करण्याची शपथ विद्यार्थ्यांनी घेतली. यशस्वीतेसाठी शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने परिश्रम धेतले.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या