Friday, May 8, 2026
Homeक्राईमसामान्य रुग्णालयातून दुचाकी चोरणाऱ्या भामटा जेरबंद

सामान्य रुग्णालयातून दुचाकी चोरणाऱ्या भामटा जेरबंद

सामान्य रुग्णालयातून दुचाकी चोरणाऱ्या भामटा जेरबंद एलसीबीची कारवाई 

जळगाव प्रतिनिधी

जळगाव शहरातील शासकीय रुग्णालय परिसरातून चोरीला गेलेली हिरो एचएफ डिलक्स मोटरसायकल स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) तात्काळ कारवाईमुळे पुन्हा मालकाच्या ताब्यात आली आहे. या प्रकरणात एक आरोपी अटकेत असून, त्याचा साथीदार फरार आहे.

दिनांक 15 फेब्रुवारी 2025 रोजी, हनुमान नगर मेहरुण येथील रहिवासी सुरेश पंडित चव्हाण (वय 61) यांच्या मालकीची हिरो एचएफ डिलक्स मोटरसायकल (क्रमांक MH 19 CE 5768) शासकीय रुग्णालय, जळगाव येथून अज्ञात व्यक्तीने चोरी केली. या प्रकरणी सुरेश चव्हाण यांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.

एलसीबीची कारवाई:

तक्रारीनंतर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना माहिती मिळाली की, सदरची चोरी रेकॉर्डवरील गुन्हेगार मोसिन शहा सिकंदर शहा (रा. फुकटपुरा, तांबापुरा) याने केली आहे. त्यानुसार, एलसीबीच्या पथकाने मोसिन शहा याला फुकटपुरा येथून ताब्यात घेतले. चौकशीदरम्या8न, त्याने साथीदारासोबत मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली आणि गुन्ह्यातील मोटरसायकल काढून दिली. मोटरसायकल जप्त करून मोसिन शहा याला पुढील कारवाईसाठी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वरी रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नकाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रवी नरवाडे, राजेश मेढे, संजय हिवरकर, पोलीस हवालदार अक्रम शेख, विजय पाटील, प्रवीण भालेराव, हरिलाल पाटील, पोलीस चालक प्रमोद ठाकूर यांनी केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास जिल्हा पेठ पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस हवालदार अनिता वाघमारे करीत आहेत. फरार साथीदाराचा शोध सुरू आहे, तो देखील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती आहे.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या