Thursday, April 30, 2026
Homeखानदेशपद्मश्री डॉ. भवरलाल जैन यांच्या श्रद्धेय दिनानिमित्त रमजान किट वाटप

पद्मश्री डॉ. भवरलाल जैन यांच्या श्रद्धेय दिनानिमित्त रमजान किट वाटप

पद्मश्री डॉ. भवरलाल जैन यांच्या श्रद्धेय दिनानिमित्त रमजान किट वाटप
जळगाव प्रतिनिधी
२५ फेब्रुवारी हा पद्मश्री डॉ.  भवरलाल जैन यांचा श्रद्धेय दिन म्हणून साजरा केला जातो. डॉ भवरलाल जैन हे सामाजिक एकतेचे प्रतीक होते. सर्व समाजाला घेऊन चालणारे व सर्व समाजाच्या सोबत बंधूभाव निर्माण करणारे होते. अशा या व्यक्तीसोबत जळगाव जिल्हा मुस्लिम मणियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांनी २७ वर्ष सेवा केली असल्याने त्यांच्या या सामाजिक एकतेला अनुसरून १ मार्च शुक्रवार पासून सुरू होणाऱ्या रमजान पर्वासाठी गरजवंत अशा ५० लोकांना रमजान किट चे वाटप जळगाव जिल्हा मुस्लिम मणियार बिरादरी तर्फे करण्यात आले.
रमजान किट मधील साहित्य

या रमजान किट मध्ये तेल, साखर, तुरदाळ, मुंग डाळ, उडद डाळ, मठ डाळ ,बेसन पीठ, लाल मिरची, शेंगदाणा, धनिया, चणे चहा पत्ती, सह खजूर , रोट,
रूहअब्जा बॉटल असा सुमारे १६०० रुपये चा एक किट ५० गरजवंतांना ८० हजार रुपयांचे किट देण्यात आले.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या