Wednesday, April 29, 2026
Homeक्राईमजळगावातून बुलेट चोरणाऱ्या दोघांना अटक

जळगावातून बुलेट चोरणाऱ्या दोघांना अटक

जळगावातून बुलेट चोरणाऱ्या दोघांना अटक

दोन बुलेट हस्तगत ,एमआयडीसी पोलिसांची कारवाई

जळगाव प्रतिनिधी

सिंधी कॉलनी परिसरातून बुलेट अज्ञात चोरट्यांनी लांबविण्याची घटना घडली होती . याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या बुलेट चोरीच्या गुन्ह्यातील दोन जणांना एमआयडीसी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे  अटक केली असून त्यांच्याकडून चोरलेल्या एक लाख तीस हजार रुपये किमतीच्या दोन बुलेट मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यांमध्ये मोटरसायकली चोरीच्या घटना वाढत असल्यामुळे पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी ,अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते , उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांनी गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना केल्या होत्या.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी शोध पथकातील तपासी अंमलदार किशोर पाटील यांनी सिंधी कॉलनी परिसरातील बाबा नगर येथून बुलेट चोरी झालेल्या गुन्ह्याचा तपास सीसीटीव्ही फुटेज तपासून त्या आधारे जावेद शेख चांद रा मास्टर कॉलनी आणि अदनान अमजद खान शाहूनगर या दोघांना गोपनीय माहितीच्या आधारे 22 फेब्रुवारी रोजी अटक करून न्यायालयात हजर केले असता 24 पर्यंत कोठडी सुनावण्यात आली होती. दोघांनी सिंधी कॉलनी येथील हर्षद दिलीप कुमार नागपाल यांची बाबा नगर येथील घरासमोरून 13 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री साडेदहा ते साडेपाच वाजेच्या सुमारास बुलेट चोरून नेली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोठडी दरम्यान  दोन्ही आरोपींनी मास्टर कॉलनी येथून बुलेट चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून एक लाख तीस हजार रुपये किमतीच्या दोन बुलेट हस्तगत करण्यात आले आहे.

पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी ,अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते , उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके ,पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश शिरसाळे ,पोलीस नाईक किशोर पाटील ,योगेश बारी, विकास सातदिवे, नितीन ठाकूर, नाना तायडे, किरण पाटील ,राहुल घेटे, आदींच्या पथकाने केली.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या