Wednesday, April 29, 2026
Homeक्राईमबंद घर फोडून चोरट्यांनी मारला साडेसहा लाखां च्या ऐवजावर डल्ला !

बंद घर फोडून चोरट्यांनी मारला साडेसहा लाखां च्या ऐवजावर डल्ला !

बंद घर फोडून चोरट्यांनी मारला साडेसहा लाखां च्या ऐवजावर डल्ला !

अमळनेर तालुक्यातील वावडे येथील घटना

अमळनेर प्रतिनिधी सुरत येथे नातेवाईकाच्या घरी बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी घर बंद असल्याची संधी साधून घरातील रोकड सर डाग दागिने असा एकूण साडेसहा लाख रुपयांच्या मुद्देमाल लंपास केल्याची घटना 28 जानेवारी रोजी अमळनेर तालुक्यातील वावडे येथे उघडकीस आली असून याप्रकरणी अज्ञात चवट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी की संजय पाटील हे तालुक्यातील वावडे येथे वास्तव्याला असून ते त्यांच्या नातेवाईक हे आजारी असल्याने ते सुरत येथे बाहेरगावी गेले होते.  दरम्यान, २५ रोजी ते सहकुटुंब घरी परतले. २८ रोजी पैसे लागणार असल्याने त्यांनी कपाट उघडून पाहिले असता त्यातील ३ लाखांची रोख रक्कम, ९५ हजाराचे १९ ग्रॅमचे सोने, ८५ हजाराच्या १७ ग्रॅमच्या सोन्याच्या ३ अंगठ्या व १ लाख ७५ हजाराची ३५ ग्रॅमची सोन्याची मंगलपोत असा ऐवज चोरी झाला आहे. संजय पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मारवड पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या