जळगावातील वाघ नगर येथे तरुणाने घेतला गळफास
कारण आले समोर , रामानंद नगर पोलिसांत गुन्ह्याची नोंद
जळगाव प्रतिनिधी
शहरातील वाघ नगर येथे राहणाऱ्या एका ४६ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी २६ जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजता घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी घरच्यांना मोबाईलवर सुसाईड नोट लिहून ९ जणांवर गंभीर आरोप करत पैशांची मागणी केल्याचे नमूद केले आहेयाबाबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते. दरम्यान पोलिसांनी तीन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे, अनिल हरी बडगुजर (वय-४६) रा.जीवन नगर ह.मु. वाघ नगर जळगाव असे मयत झालेल्या यक्तीचे नाव आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, शहरातील जीवन नगरातील रहिवाशी अनिल बडगुजर हे वाघ नगर येथे एकटेच वास्तव्याला होते. जिल्हा परिषदेतील डीआरडीओ विभागातील बचतगट विभागात कंत्राटी पध्दतीने तो मॅनेजर म्हणून काम करत होते. सोमवारी २६ जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजता त्यांनी वाघ नगर येथील राहत्या घरात त्यांने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापुर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहून आईवडील व भाऊ यांच्या मोबाईलवर पाठवून दिली होती. सुसाईड नोट वाचून अनिलचे वडील हरी बडगुजर आणि भाऊ अमित बडगुजर हे दोघी तातडीने वाघ नगर येथील राहत्या घरी धाव घेतली पण तोपर्यंत उशीर झाला होता.
पाठविलेले मजकूर असे
आई आणा मला माफ करं ह्या वयात मी तुम्हाला नाही ते दुःख देत आहे पण खरचं मी आता खूप थकलो आहे, जेंव्हा पासुन मला समजायला लागले तेव्हा पासून प्रत्येक संकटाला मी सामोरे गेलो, आज नाही तर उद्याचा दिवस माझा राहिलं ह्या आशेवर जगत आलो पण संकट माझा पिच्छा सोडायला तयार नाहीत, मला जगू वाटत होते,तुम्ही आहेत तो पर्यंत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करायच्या होत्या,
पण मी किती बदनशिबी माझ्याच इच्छा मी पूर्ण करु शकलो नाही, काय पाप केले होते काय माहित पण मी सर्वांचे चांगले होईल ह्याचं विचाराने जगत आलो, तरी माझ्या वाट्याला असे दुःख यावे,असे संकट यावे, मी माझ्या स्वतच्या. बुध्दीवर आज पर्यंत प्रगती केली पण काही लोकांना माझी प्रगती पाहीली गेली नाही, स्वतः च्या स्वार्था साठी हरेश्र्वर भोई याने काही महिलांचा वापर केला मला एक वर्षापूर्वी सर्व समजले होते पण मी दुर्लक्ष करत होतों, माझ्या मरणास हरेश्र्वर भोई यास जबाबदार धरण्यात यावे
राजु लोखंडे हे फक्तं पैश्यासाठी भोईचे ऐकत होते आणि माझे काही नुकसान केले, यांना फक्तं पैसा प्रिय आहे, पैश्या साठी वाट्टेल ते करायला तयार असतात, भोई चे ऐकून शरद पाटील, संदिप खेडकर यांनी रुपाली पाटील, सुरेखा पाटील, कोमल जावळे, साधना देशमुख, सीमा पाटील यांनी माझी काही चूक नसताना खोट्या तक्रारी केल्यात, PD ना काही अधिकार नसतांना त्यांनी माझे वैयक्तिक बँक खातेचे तपशील सन 2020 पासून काढले पण त्यात त्यांना काहिच आढळून आले नाही, कारण मी आलेल्या मानधन आणि माझ्या इतर व्यवसायावर वर सर्व व्यवहार करत होतो,
त्यामुळे माझ्या आत्महत्येस हरेश्र्वर भोई,राजु लोखंडे ,कोमल जावळे,सुरेखा पाटील रुपाली पाटील,सीमा पाटील,साधना देशमुख.शरद पाटील, संदिप खेडकर, यांना दोषी ठरवण्यात यावे व, जो पर्यंत यांना अटक होत नाही तो पर्यंत माझ्या देहास अग्नी डाग देण्यात येऊं नये ही माझी शेवटची ईच्छा” असे नमूद केले आहे.
दरम्यान या संदर्भात प्रौढाच्या आईवडील, भाऊ आणि दोन बहिणींशी संवाद साधला असता त्यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, अनिल याला गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्या विभागातील बचत गटातील महिला व कर्मचारी हे विनयभंग आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत होते. या तसेच स्थानिक समितीमध्ये अनिलच्या विरोधात तक्रारही केली होती. ती तक्रार मागे घेण्यासाठी महिला कर्मचारी यांनी ६ लाखांची मागणी केली. सुरूवातीला ६ लाख रूपये दिले परंतू त्यानंतर तक्रार मागे न घेता पुन्हा ६ लाखांची मागणी केली. या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केली आहे. असा आरोप आई लिला बडगुजर आणि बहिण स्वाती पचलोड यांनी केला आहे. दोषींना अटक करण्यात यावी आणि आम्हाला न्याय देण्यात यावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
याबाबत तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. मयताच्या पश्चात आई लिला, वडील हरी बडगुजर, भाऊ अमित आणि दोन बहिणी असा परिवार आहे.